Skip to content

Gold Silver Rate | सोने-चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले; असे आहेत दर..?

Gold Rate Today

Gold Silver Rate | सोने-चांदी हे मौल्यवान धातू आता काही दिवसांत सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर जाण्याचे चित्र दिसत आहे. मागील महिनाभरातील सोने आणि चांदीच्या दरवाढीचा वेग हा आश्चर्यचकित करणारा आहे. आता ह्या मौल्यवान धातूंची ही मोठी उसळी अजूनही थांबलेली आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोने व चांदीने ह्या काळात किंमतींचा नवा सर्वकालीन विक्रमी उच्चांक गाठलेला आहे.(Gold Silver Rate)

परंतु, सोने-चांदीच्या दरांत होणारी ही दरवाढ थांबण्याची किंवा माघार घेण्याचे कोणतेच संकेतदेखील दिसत नाही. एका पाठोपाठ एक नवीन विक्रम सोने-चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू आपापल्या नावावर रचत आहेत. मागील आठवड्यात ४ मे २०२३ रोजीचा, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ६१,६४६ रुपयांचा उच्चांकी विक्रम हा आता मोडलेला आहे. सोबतच, नवीन विक्रम देखील तयार होत आहेत. तर, गेल्या आठवड्यात प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ६२,७२८ रुपये अशी होती आणि चांदीची किंमत ही ७६,४०० रुपये प्रति किलो असा होता. (Gold Silver Rate)

Top 10 Electric Scooter India | भारतातील टॉप इलेक्ट्रिक स्कूटर; काय आहेत त्यांच्या किंमती?

सोने झळाळले

२४ कॅरेट  प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज ६३,९७० रुपये अशी असून, मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ही ६३,३९० रुपये प्रति १० ग्रॅम वर ​​बंद झालेली होती. बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, चांदी प्रति किलोसाठी आज ७८,२१० रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, मागील ट्रेडमध्ये ह्या चांदीची किंमत ही ७७,८२० रुपये प्रतिकिलो इतकी होती. उत्पादन शुल्क, राज्य कर तसेच मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती ह्या देशभर बदलत असतात.(Gold Silver Rate)

कोठे कसे आहेत दर..? 

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, राज्यात मुंबईमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज ५८,५२९ रुपये अशी आहे. तसेच, मुंबईत २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६३,८५० अशी आहे. पुण्यात २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ५८,५२९ असा असेल. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६३,८५० रुपये असा आहे. नागपूर येथे २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ५८,५२९ असा आहे. तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६३,८५० रुपये इतका आहे. तर, नाशिकमध्येही २२ कॅरेट सोन्याचा दर हा आज ५८,५२९ आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा आज ६३,८५० रुपये असा आहे.(Gold Silver Rate)

(वरील दर हे सूचक आहेत तसेच त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Nashik Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पत्नीच्या खुनानंतर पतीचं टोकाचं पाऊल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!