Skip to content

Top 10 Electric Scooter India | भारतातील टॉप इलेक्ट्रिक स्कूटर; काय आहेत त्यांच्या किंमती?


Top 10 Electric Scooter India | भारतात गेल्या काही वर्षांपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात विविध बदल पाहायला मिळता आहेत. आता इलेक्ट्रिक वाहनांना नागरिकांच्या माध्यमातून चांगली पसंती मिळू लागलेली आहे. विशेष म्हणजे वाढते प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आता केंद्र शासनाने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहित करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढू लागली आहे.

Election Result | नाशिक भाजपा कार्यालयात ढोलताशांवर नाचले पदाधिकारी; विजयाचा जल्लोष 

सद्यस्थितीला देशात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर सर्वाधिक विकल्या जाता आहेत. म्हणजेच ज्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक लाखापेक्षा अधिक आहे अशा स्कूटरची आपल्या देशात सर्वाधिक विक्री होत असल्याची माहिती समोर आलेली आहे.

Nashik Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पत्नीच्या खुनानंतर पतीचं टोकाचं पाऊल

Top 10 Electric Scooter India

  • ola s1 pro – सध्या ओला कंपनीची Ola S1 Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर देशात सर्वात जास्त विकली जात आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख ते 1.47 लाख रुपये यादरम्यान ठेवण्यात आली आहे.

 

  • टीव्हीएस आय क्यूब इलेक्ट्रिक – TVS ही देशातील एक प्रमुख दुचाकी निर्मातीची कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक पेट्रोल बाईक आणि स्कूटर बाजारात आधीपासूनच लोकप्रिय आहेत आणि दरम्यान इलेक्ट्रिकल स्कूटरची देशात मागणी वाढल्यानंतर टीव्हीएस ने देखील इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली आहे. या मोटर कंपनीने प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर iQube बाजारात दाखल केलेली असून ही गाडी ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 1.56 लाख ते 1.62 लाख रुपये आहे.

 

  • बजाज चेतक इलेक्ट्रिक – इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये बजाज कंपनीची चेतक इलेक्ट्रिक देखील खूपच लोकप्रिय ठरलेले आहे. बजाज ऑटोच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर चेतकच्या विक्रीत यावर्षी तर विक्रमी वाढ झालेली आहे.

 

  • Ather 450x – Ather Energy या कंपनीची Ather 450X ही इलेक्ट्रिक स्कूटर देशात अलीकडे खूपच लोकप्रिय झालेली आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत रु. 1.26 लाख ते रु. 1.29 लाख दरम्यान आहे.

 

  • Vida V1 Pro – Hero MotoCorp कंपनीने पेट्रोल बाईकमध्ये अनेक लोकप्रिय बाईक तयार केलेल्या आहेत. तसेच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर देखील तयार केलेली आहे. कंपनीने Vida ब्रँडच्या V1 Pro या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली असून ही गाडी अल्पकालावधीतच लोकप्रिय ठरलेली आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 1.26 लाख रुपये आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!