Crime News | बॉयफ्रेंडची शुल्लक चूक; गर्लफ्रेंडने थेट डोळ्यात घातली सुई

0
3
Nagpur Crime

Crime News | सध्या बहुतेक रिलेशनशिप्स असे असतात की ज्यामध्ये कपल्सचा एकमेकांवरती विश्वास नसतो आणि मग त्यांच्यामध्ये वाद-विवाद होणे, एकमेकांवर अविश्वास दाखवणे आजकाल अशा गोष्टी घडताना दिसतात. तर या वादामध्येच तरुण-तरुणी एखादं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. आताही अशीच एक घटना घडलेली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.  एका 44 वर्षीय महिलेने आपला प्रियकर इतर मुलींकडे पाहतो म्हणून त्याच्या डोळ्यात हायपोडर्मिक ‘रेबीज सुई’ने वार केलेला आहे. (Crime News)

Michaung Cyclone | ‘मिचॉंग’ चक्रीवादळ माजवणार कहर; 118 रेल्वेगाड्या रद्द

अमेरिकेत राहणारी सँड्रा जिमेनेझ (वय 44) या महिलेने तिच्या प्रियकारावरती हल्ला केला आहे. तिचा प्रियकर इतर मुलींकडे पाहत होता या रागात तिनं हे कृत्य केलेलं आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहीती देत सांगितलं की, आरोपी महिलेचा प्रियकर इतर मुलींना पाहत होता यामुळे त्या महिलेला प्रचंड राग आला होता. त्यामुळे तिने तिच्या प्रियकरासोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती आणि त्यांच्यातील वाद इतका वाढला की तिने डायरेक्ट डोळ्यात सुईने हल्ला करत तीचा राग व्यक्त केला.

25 नोव्हेंबर रोजी सँड्रा जिमेनेझ आणि तिच्या प्रियकराचं भांडण झालेलं होतं. तिचा प्रियकर इतर मुली का पाहतो? याबाबत तिने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती आणि त्या दोघांमधील वाद इतका वाढला की रागाच्या भरामध्ये तिने प्रियकराच्या डोळ्यात सुईने वार केले. धक्कादायक म्हणजे ही सुई काही सामान्य नसून नसून ती रेबीची सुई असल्याची माहीती समोर आलेली आहे. रेबीजची सुई सँड्रानं कुत्र्यासाठी आणलेली होती.

Gold Silver Rate | सोने-चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले; असे आहेत दर..?

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, सँड्राचा प्रियकर बेडवर झोपायला गेला होता. त्यावेळी सँड्राने दोन रेबीजच्या सुया घेतल्या आणि प्रियकराच्या अंगावरती उडी मारली.  रागाच्या भरात तिने ती सुई तिच्या प्रियकराच्या उजव्या डोळ्यात खुपसली आणि यानंतर सँड्राने घाबरून तिथून पळ काढला. सध्या तिच्या प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच आरोपी सँड्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आलेली आहे. (Crime News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here