Maratha Reservation | नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा पेटला असून, अनेक ठिकाणी आंदोलकांकडून सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या नेत्यांना मराठा आंदोलकांकडून अडवले जात त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठीचा आग्रह केला जात आहे. असाच प्रकार काल (दि.२३) ऑगस्ट शुक्रवार रोजी घडला. काल नाशिकमध्ये काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हेदेखील उपस्थित होते.
यावेळी नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्या गाड्या अडवल्या त्यांना मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह केला. यावेळी आंदोलक आक्रमक झाले असून, त्यांनी या नेत्यांसमोर जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान, आता या प्रकरणी संबंधित मराठा आंदोलकांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आंदोलकांनी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गाडी अडवत त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह करत निवेदन दिले आणि घोषणाबाजी केली होती. या आंदोलकांनी विना परवानगी बेकायदेशीररित्या जमाव जमवत आरक्षणासारख्या वादग्रस्त मुद्द्यावर घोषणाबाजी करून परिसरात तणाव निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.(Maratha Reservation)
Nashik News | नाशकात मराठा आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांना घेरलं; वडेट्टीवारांचा केला निषेध
Maratha Reservation | नेमकं प्रकरण काय ?
काल नाशिकमध्ये महायुतीचा महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर, दुसरीकडे काँग्रेसचा पदाधिकारी मेळावाही आयोजित होता. यावेळी मराठा आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेत त्यांना आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह केला. त्यांची गाडी अडवली. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आणि भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह केला. तर, नाना पटोलेंची गाडी अडवत त्यांच्या गाडीत असलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून झाला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी कार्यक्रमस्थळाबाहेर नाना पटोले यांना घेरलं आणि त्यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. (Maratha Reservation)
पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाल्याने नाना पटोले गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांसोबत चर्चा करताना नाना पटोले यांनी त्यांना आश्वासन दिले की “आम्ही तुमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून, आगामी काळात आम्हीदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रही आहोत”. तर नाना पटोलेंसोबत बोलताना मराठा आंदोलकांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेत “सक्षम विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला द्या”, अशी विनंती केल्याचे पहायला मिळाले.
Maratha Reservation | भुजबळांचं टेन्शन वाढलं; मनोज जरांगेंचे पुढील उपोषण येवल्यात..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम