Nashik News | नाशकात मराठा आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांना घेरलं; वडेट्टीवारांचा केला निषेध

0
41
Maratha Reservation
Maratha Reservation

Nashik News | नाशिक :  राज्यात काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून, आज याचे पडसाद नाशकातही पहायला मिळाले. नाशिकमध्ये आज एकीकडे महायुतीचे महिला सशक्तीकरण शिबिर आयोजित असून, दुसरीकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावाही नाशिकमध्ये पार पडत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मराठा समाजाच्या नेते आक्रमक झाले असून, त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना इशारा दिला होता.

Nashik News | नेमकं काय घडलं..?

यानंतर आता नाशिकमधील काँग्रेस मेळाव्यासाठी आलेले काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची गाडी मराठा आंदोलकांकडून अडवण्यात आली असून, त्यांना मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) भूमिका स्पष्ट करण्याबाबतचे निवेदनही यावेळी मराठा आंदोलकांकडून देण्यात आले. राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांकडून अनेक लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षांचे नेते, यांच्या गाड्या अडवून किंवा त्यांच्या घराबाहेर आंदोलन करून त्यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे.

Nashik News | नाशकात काँग्रेसचा भव्य मेळावा; पण मेळाव्यात एकुलत्या एक आमदारालाच स्थान नाही..?

मराठा आंदोलकांनी नाशिकमध्ये आलेल्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्याचा आणि आपली मागणी सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांकडून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर नाना पटोले यांच्या गाडीत बसलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला.

पटोलेंना गाडीखाली उतरावं लागलं… 

दरम्यान, नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून, त्यांनी कार्यक्रमस्थळाबाहेर नाना पटोले यांना घेरलं. त्यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा आणि बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र, तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर नाना पटोले गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली.

Nashik News | नाशकात एटीएसची मोठी कारवाई; एका स्थानिकासह, तीन बांगलादेशी घुसखोर ताब्यात

वडेट्टीवार यांचा निषेध; सक्षम विरोधी पक्ष नेता द्या 

यावेळी पटोले यांनी “आम्ही तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, येणाऱ्या काळात आम्हीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रही आहोत. हा लढा आम्हीही लढणार आहोत”, असे नाना पटोले म्हणाले. तसेच नाना पटोलेंसोबत बोलताना मराठा आंदोलकांनी विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत करत एखादा सक्षम विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला देण्याची विनंती केल्याची माहिती आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here