Pune Muk Morcha | भर पावसात शरद पवारांचे तोंडाला काळा मास्क लाऊन ‘मुक आंदोलन’

0
49
Pune Muk Morcha
Pune Muk Morcha

Pune Muk Morcha | पुणे: बदलापूरमधील एका नामांकित शाळेत एका चार वर्षीय आणि एका सहा वर्षीय मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या संतापजनक घटनेने राज्याचे वातावरण ढवळून काढले. ही घटना उघडकीस येताच संतप्त बदलापुरकरांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत असून, आज या घटनेच्या निषेधार्थ विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ आणि बदलापुरमधील आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला होता. (Pune Muk Morcha)

Maharashtra Bandh | महाविकास आघाडीला कोर्टाचा झटका; महाराष्ट्र बंद केल्यास थेट कारवाई होणार

Pune Muk Morcha | ‘महाराष्ट्र बंद’ नाही ‘मुक आंदोलन’ 

मात्र, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्र बंदच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत कोणताही पक्ष महाराष्ट्र बंद करू शकत नाही आणि असे केल्यास त्यांच्यावर कारवाईचे निर्देश सरकारला दिले होते. त्यामुळे शरद पवारांनी काल आवाहन करत बंद घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद न करता ठिकठिकाणी ‘मुक आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. (Pune Muk Morcha)

बदलापूरमधील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यासह महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार, महापौर, कार्यकर्ते ही रस्त्यावर उतरले असून, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आज भर पावसात हे नेते तोंडाला काळी फित बांधून ‘मूक आंदोलन’ करत आहेत.तोंडावर काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहे. पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाविकास आघाडीचे हे मुक आंदोलन सुरू आहे.

Sharad Pawar | ‘बदलापूर मध्ये कोणता राजकीय पक्ष होता?’; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

भर पावसात काळा मास्क लावून शरद पवार आंदोलनात सहभागी 

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज राज्यभरात आंदोलनं करण्यात येणार आहे. याची सुरुवात स्वतः पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात झाली. येथे महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु असून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळी फित बांधून शरद पवार भर पावसात या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह सुप्रिया सुळेही येथे बसून आहेत. तोंडावर काळी पट्टी, मास्क लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हे मूक आंदोलन सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here