Manoj Jarange | विधानसभा निवडणूक लढवणार..?; मनोज जरांगेंची मोठी घोषणा..!

0
33
Manoj Jarange
Manoj Jarange

पुणे :  मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभा (Loksabha election) निवडणुकीत त्यांनी सुरुवातीला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, नंतर त्यांनी थेट सक्रीय सहभाग न घेता “कुणाला पाडायचंय त्याला पाडा”, असे आवाहन मराठा समाजाला केले. मात्र, जरांगे यांच्या आवाहनाचा आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव परभणी, जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. तर, बीड लोकसभा मतदार संघात (Beed) मराठा विरुद्ध वंजारी, ओबीसी असं राजकीय समीकरण पाहायला मिळालं.

दरम्यान, आता मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार देणार असल्याची घोषणा केली असून, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास आपण २८८ मतदारसंघातून सर्व जाती-धर्माचे उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे यांनी केली आहे.

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय..!

तसेच यावेळी त्यांनी ४ जूननंतर उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. तर, विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातही त्यांनी घोषणा केली. मराठा समाजाला ओसीबीतून आरक्षण न मिळाल्यास विधानसभेला २८८ मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणाच यावेळी त्यांनी केली. कुणबी आणि मराठा हे एकच असून, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. तर, विधानसभा लढवणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. तर, जरांगेंनी घोषणा करताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. (Manoj Jarange)

Manoj Jarange | पालकमंत्री म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे

कुठल्याही प्रकारचा जातीवाद आपल्याला मान्य नाही. मी या दोन्ही समाजांना शांततेचं आवाहन करत असून, मी कुठल्याही जातीविषयी एकदाही बोललेलो नाही किंवा मी ओबीसी बांधवांनाही कधी चुकीचं काही बोललेलो नाही. त्यांचे नेतेच काहीही बोलतात. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन करायला हवं. पण ते तसं काही करत नाही, असे म्हणत जरांगे यांनी बीडमधील जातीय तणावावर आपले मत मांडले.  (Manoj Jarange)

Manoj Jarange | तुला तंगडीसकट बाहेर ओढतो; ४ जूनला मराठ्यांनी अंतरवालीला या


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here