Manoj Jarange | मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाली असून, यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर चांगलेच शाब्दिक आसूड ओढले. “तो येवल्यावाला म्हणतो आम्ही ६० टक्के आहोत. तू आम्हाला बधीर समजतो काय? आणि नंतर म्हणे की एसटी फुल्ल भरलेली आहे. मग मी म्हटलं मला जरा दार उघडू दे. त्या एसटीमध्ये तु एकटाच तंगड्या लांबवून बसलाय. तुला त्या तंगडीसकट बाहेर ओढतो. तर, ४ जूनला सगळ्यांनी अंतरवाली सराटी येथे या. कारण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय यांची सुट्टी नाही आणि आता मला उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करायचा नाही. करोडोच्या संख्येने मराठ्यांनी ४ जूनला एकत्र या, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.(Manoj Jarange)
Manoj Jarange | तुझी नियत चांगली नाही
दरम्यान, भुजबळांवर टिका करताना जरांगे पाटील म्हणाले की,”तुझी नियत चांगली नाहीये. कारण तुला फक्त खायची सवय लागलेली आहे. ८० टक्के ओबीसी महामंडळ तुम्ही खाल्लंय. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये. तरीही त्यांचाच मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध आहे. वंजारी व धनगर समाजाच्या आरक्षणालाही आपल्या आरक्षणाचा धक्का लागत नाही, पण तरीही तुम्ही त्यांना तुमच्या सभेला बोलावतात.(Manoj Jarange)
Manoj Jarange | मला हलक्यात घेऊ नका..; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा
जेलमध्ये टाकणार, तडीपार करणार
सरकारने मला अटक करण्याचा डाव रचला असून, आता माझ्यावर एसआयटी नेमली आहे. हे मला जेलमध्ये टाकणार आहेत. दुसरं एक की रोज माझ्यावर दोन-तीन गुन्हे दाखल करायचे आणि मला रात्रीतून तडीपार करायचं आहे. पण जरी मी तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात गेलो. तरी या राज्यातले मराठे मी त्या राज्यात बोलवेल आणि मोर्चे काढेल. मी जेलमध्ये सडेल, पण तरी मी मागे हटणार नाही. जेलमध्येही सगळे मराठे कैदी एकत्र करेल आणि मोर्चा काढेल. (Manoj Jarange)
Manoj Jarange | मनोज जरांगे राजकारणात येणार; आज समाजासमोर भूमिका मांडणार..?
निवडणूक आली की हे चपलासकट पाया पडतात
मला आणि माझ्या मराठा समाजाला या राजकारणात यायचंही नाहीये. फक्त आमचं आरक्षण तुम्ही आम्हाला द्या. मराठा बांधवांनो कोणत्याही नेत्याच्या पुढे पुढे करू नका. तुमच्या मुलांना शिकवा त्यांना शिकवून अधिकारी करा. मग हेच लोक तुमच्या लेकरांच्या मागे मागे पळतील. कोणत्याही नेत्याला आणि त्याच्या मुलांना मोठं करण्याचे हे स्वप्न बंद करा. कारण हे नेते तुमच्या जीवावरच डेरिंग करतात. तुमच्या मतांवर हे लोक दोन दोन कोटीच्या गाडीत बसतात. त्यामुळे तुम्ही यांच्या पुढे पुढे करू नका. निवडणूक आली की हे लोक चपलासकट आपल्या पाया पडतात. मात्र, निवडणूक झाल्यानंतर हेच नेते कुठे गुल होतात. तेच काही कळत नाही.(Manoj Jarange)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम