Manoj Jarange | मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित; भाजप, आमदारांविरोधात ठोकला शड्डू!

0
72
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange:  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांनी मागील उपोषणावेळी मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या शिष्टमंडळाला 13 जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. यादरम्यान, त्यांनी राज्यभरात शांतता जनजागृती रॅली जिल्हास्तरावर सुरू केली होती. दरम्यान, सरकारला दिलेला हा कालावधी संपल्यानंतर त्यांनी 20 जुलैपासून अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) पुन्हा उपोषण सुरू केले होते. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

नारायणगडच्या मठाधिपतींच्या हस्ते सोडले उपोषण

आज नारायणगडचे मठाधिपती व गावातील महिलांच्या हस्ते त्यांनी जूस पिऊन उपोषण सोडले. यावेळी त्यांनी उपोषण सोडत असल्याचे कारणही सांगितले असून, तब्येत ढासळत असल्याने आपण आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले. काल उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रकृती ढासळल्याने गावकऱ्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह करत सलाईन लावली होती. आज सकाळीही त्यांची शुगर आणि बीपी कमी झाल्याने जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (Manoj Jarange Patil)

Manoj Jarange | खासदार भास्कर भगरे जरांगेंच्या भेटीला, सोबत भुजबळांचे कट्टर विरोधक

Manoj Jarange | मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार, पण… 

मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार होतो आणि आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्याचा आग्रह करू नये, सलाईन लाऊन उपोषण करण्याचा उपयोग नाही, असे खोटे आणि बेगडे उपोषण मी करणार नाही. सलाईन लाऊन या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढील विधानसभा निवडणुकीची (vidhansabha election) तयारी सुरू केलेली बरी, असा सूचक इशारा त्यांनी सरकारला यावेळी दिला.

Manoj Jarange Patil | भुजबळ महाराष्ट्र पेटवायला निघाले; अजित पवारांचे लोक मराठ्यांना लक्ष्य करताय 

भाजप सत्तेवर येऊ देऊ नका; जे विरोधात बोलताय त्यांचा बंदोबस्त

ज्या सत्तेत आणि ज्या खुर्चीत सरकारचा जीव आहे. त्यांच्यासाठी आता आपण तयारीला लागायला पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, आणि कोणाला निवडून आणायचंंय आणि कोणाला पाडायचं, कोणते आमदार, खासदार विरोधात बोलताय. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. माझे मराठा समाजाला एकच सांगणे आहे की पुन्हा भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. त्यामुळे आता मी इथं सलाईन लाऊन उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले.  (Manoj Jarange Patil)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here