देवळा | वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया निविदाविरोधात सर्व पक्षीय नेत्यांकडून कारखाना कार्यस्थळावर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कुठल्याही परिस्थितीत कारखाना विक्रीची प्रक्रिया पूर्ण न होऊ देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. दुपारी तीन वाजता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना याबाबतचे निवेदन सादर करून उपोषण मागे घेण्यात आले.(Vasaka)
(दि.26) जुलै रोजी राज्य सहकारी बँकेकडून वसाकाच्या थकीत कर्जाबाबत विक्री लिलावाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वसाका (Vasaka) बचाव कृती समिती, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार, आजी माजी पदाधिकाऱ्यांचे वारसदार यांनी एकत्र येत बुधवार (दि.24) रोजी वसाका कार्यस्थळावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून विक्री निविदा प्रक्रिया बंद करावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकामी उपोषण सुरू केले होते.
या बैठकीसाठी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहूल आहेर, भाजप नेते केदा आहेर, कृती समितीचे अध्यक्ष पंडितराव निकम, निमंत्रक सुनील देवरे, योगेश आहेर, विलास देवरे, श्रीमती लक्ष्मीताई देवरे, माजी संचालक यशवंत पाटील, युवा नेते सुनील आहेर, कामगार युनियनचे नेते आदींनी आपल्या भाषणातून विक्री प्रक्रियेस विरोध नोंदवला.
सरकारने सभासदांना विश्वासात घेऊन करखान्याबाबत निर्णय घ्यावा. हा कारखाना सभासदांना चालवण्यास द्यावा किंवा सहकार तत्वावर निवडणूक घ्यावी जे संचालक मंडळ अस्तित्वास येईल त्यांना कारखाना चालवण्याची जबाबदारी द्यावी. 5 वर्षात कारखाना आम्ही कर्जमुक्त करून दाखवतो.
– योगेश आहेर (सभापती, बाजार समिती उमराणे)
Vasaka | वसाकाच्या विक्री प्रक्रीयेविरोधात संस्थापक अध्यक्षांचे वारसदार आक्रमक
वसाका सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न – आ. आहेर
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले की, “वसाका विक्रीची निविदा कुठल्याही प्रकारे पूर्ण होऊ देणार नसून, वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून राज्य सहकारी बँक असो की शासन दरबारी जाणे असो वसाका सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येतील.यासाठी आपण सदैव समितीसोबत असून, याकामी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.
तर भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी सभासद व कामगारांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण करून खरेदी घेणाऱ्या व्यक्तीस वसाका कार्यस्थळावरून पळवून लावण्याची रोकठोक भूमिका मांडल्याने कामगार व ऊस उत्पादकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून उपोषणाची सांगता केली.(Deola)
करार पूर्ण होण्यापूर्वीच कारखाना चालवायला घेतलेल्या अभिजीत पाटलांनी येथून पळ काढला. त्यामुळे कर्ज व गैरव्यवस्थापनाचा परिणाम वसाका कार्यक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला. वसाकाचे कार्यक्षेत्र हे पाच तालुक्यांचे असून, येथील सर्व लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि कारखाना पुन्हा सुरू करावा.
– कुबेर जाधव
Deola | वसाका वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; बुधवारी लाक्षणिक उपोषणाचा एल्गार
Vasaka | सभासद, कामगारांच्या मागण्या काय..?
- राज्य सहकारी बँकेचे कारखान्यावर 110 कोटीच्या आसपास व्याजासह कर्ज आहे. कारखान्याची मालमत्ता ही चारशे कोटीच्या आसपास असतांना राज्य सहकारी बँकेने 162 कोटींची निविदा काढली असून त्यात कामगार देणी, व्यापारी देणी, ऊस उत्पादकांचे देणे याचा कुठलाही समावेश नसल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली. यामुळे सभासद, कामगार आक्रमक झाले होते.
- कारखाना हा भाडे तत्वावर सुरू करण्यापेक्षा सहकार तत्वावर सुरू करावा, याकामी राज्य शासनाने केंद्र शासनाची मदत घेऊन निधी उभारण्याची सभासदांची मागणी आहे.
- समिती सर्वपक्षीय असल्याने शासन दरबारी मुद्दा प्रखरतेने मांडण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेरांनी पुढाकार घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आल्याने आहेर यांनी सकारात्मकता दाखवत वसाकाची चाके फिरण्यासाठी त्याशी निगडित असलेल्या सर्व घटकांना बरोबर घेण्याची हमी दिली.(Deola)
एक एक रुपया जमवून हा कारखाना त्यावेळी सभासदांनी उभा केला होता. त्यामुळे कारखाना विक्री न करता पुन्हा कुणाला तरी चालवायला द्यायला पाहिजे किंवा सभासदांच्या ताब्यात द्यायला हवा.
– विलास देवरे (मा. सभापती, बाजार समिती उमराणे)
यावेळी मविप्रचे संचालक विजय पगार, शेतकरी नेते यशवंत गोसावी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, कुबेर जाधव, माजी संचालक वसंत मोरे, केशव देवरे, प्रभाकर पाटील, जगदीश पवार, महेंद्र आहेर, जितेंद्र आहेर, शशिकांत निकम, यशवंत शिरसाठ, रवींद्र सावकार, कैलास देवरे, संजय गायकवाड, मिलिंद शेवाळे, नानाजी मोरे, धर्मा देवरे, सुनील पवार, राजेंद्र आहेर, फुला जाधव, प्रशांत शेवाळे, वसंत पाटील, धनंजय बोरसे, पी.डी निकम, रामकृष्ण जाधव, दिलीप आहेर, प्रभाकर पाटील, चिंतामण आहेर, शांताराम पगार, सुभाष गायकवाड, राजेंद्र शिरसाठ, भरत पाळेकर, पुंडलिक आहेर, दीपक निकम, अरुण सोनवणे, बाबुराव चव्हाण, दत्तू देवरे, विजय जगताप, संतोष शिंदे, सचिन सूर्यवंशी, संदीप पवार, भाऊसाहेब मोरे आदींसह सभासद कामगारांनी उपोषणाला आपला सहभाग नोंदवला. यावेळी देवळा पोलिसांकडून खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम