सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवार (दि.22) रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रा.डॉ.मालती आहेर अध्यक्षस्थानी होत्या. ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका एकता आहेर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका लिना अहिरराव यांनी (गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः) हा गुरुमंत्र सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व समजावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. शिक्षिका कविता पवार यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम