Manoj Jarange | खासदार भास्कर भगरे जरांगेंच्या भेटीला, सोबत भुजबळांचे कट्टर विरोधक

0
80
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली वेळ 13 जुलै रोजी संपली असून, जरांगे यांच्या नेतृत्वात सध्या राज्यभरात जिल्हा स्तरावर ‘शांतता जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात येत आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभेचे (Dindori Lok Sabha) नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare ) यांनीही अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांचे विरोधक माणिकराव शिंदे हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, मागील वेळी जरांगे यांचे उपोषण सोडताना मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांच्याकडून 13 जुलैपर्यंतची वेळ मागितली होती. ही वेळ संपल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उद्या (दि. 20) जुलैपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल अनेक नेते जरांगे यांची भेट घेत असून, आज खासदार भास्कर भरगे यांनीही त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, नेमकी काय चर्चा झाली याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही.

Manoj Jarange Patil | भुजबळ महाराष्ट्र पेटवायला निघाले; अजित पवारांचे लोक मराठ्यांना लक्ष्य करताय 

जगलोच तर ॲम्बुलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईल 

उद्यापासून मनोज जरांगे हे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असून, उपोषणाच्या 17 दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली काढणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. जर, 17 दिवसांनंतर जगलोच तर अठराव्या दिवशी तसाच ॲम्बुलन्समधून मी शांतता रॅलीत सहभागी होईल असे जरांगेंनी सांगितले. 17 दिवस कठोर आमरण उपोषण व त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली करण्याचे यावेळी जरांगे यांनी जाहीर केले. तर, 20 तारखेला यांचे 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवणार असल्याचेही यावेळी जरांगे म्हणाले.

Manoj Jarange | जरांगेंच्या गावात दगडफेक, रास्तारोको; यामागे भुजबळांचा हात असल्याचा जरांगेंचा दावा..?

Manoj Jarange | एक दिवस बाकी; सरकार काय तोडगा काढणार..?

दरम्यान, सगेसोयऱ्यासह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांची मागणी असून, मागील उपोषणावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी एक महिन्याचा म्हणजेच 13 जुलैपर्यंतचा कालावधी दिला होता. हा अवधी संपला असून, आता जरांगे पाटील 20 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. तर, 17 दिवसाच्या उपोषणानंतर ते पुन्हा पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असून, या भागात शांतता रॅली काढणार आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगे यांना संयम ठेवण्याची विनंती केली आहे. मात्र, जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून, आता केवळ एक दिवसाचा कालावधी बाकी आहे. यावर सरकार काय तोडगा काढणार..? या सरकारच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here