Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्नी थेट इशारा दिला आहे. “जर मला महाराष्ट्रातून काढलं. तर मी पण लई शहाणा आहे. इकडचे मराठे तिकडच्या राज्यात बोलवून तिकडे मोर्चे काढेल. जेलमधले सगळ्या मराठा कैद्यांना एकत्र करून मोर्चा काढेल. पण मी माझ्या समाजाशी गद्दारी करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मला जेलमध्ये टाकाल. पण या ६ कोटी मराठ्यांचं काय करणार..? मला इतक्या हलक्यात घेऊ नका. मी सगळ्यांची टांगे पलटी करेल आणि मराठा आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.(Manoj Jarange)
Manoj Jarange | जर शेवटी नर्ड्याला लागलेच तर…
तसेच जरांगे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. तुम्ही १ महिना शांत राहा, काही जण आम्हाला म्हटले आहेत की निवडणूक झाल्यावर बघू. कोणी कोणी आणि काय काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा. एक महिना बघू आणि जर शेवटी नर्ड्याला लागलेच तर आहेच आम्ही. जर तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही स्व:तचं संरक्षण करा. वेळ जर आली तर एकवेळ आपला उमेदवार द्यायचा नाही. पण त्यांना पाडल्याविना राहायचं नाही. कुठल्याही जातीचा नेता जर मराठा विरोधी भूमिका घेईल तर त्याला निवडून येऊ द्यायचं नाही”, असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलं.(Manoj Jarange)
Manoj Jarange | मनोज जरांगे राजकारणात येणार; आज समाजासमोर भूमिका मांडणार..?
समाजाने काय करायचं आणि काय करायचं नाही
“आम्ही मराठा क्रांती मोर्चे शांततेत काढले होते. आम्हाला जातीवादी म्हणता मग प्रतीमोर्चे कुणी काढले ? त्याचं आता सोडून द्या. कुठे दिसतोय का तो? आपल्या नादी लागल्यावर असं कुठेच दिसत नाही. समाजाने काय करायचं आणि काय करायचं नाही हे ठरलंय. आता कुणी कुणावर टीका करायची नाही आणि निकाल जाहीर झाल्यावर कुणाचा जयजयकारही करायचा नाही. एकजूट फुटू देऊ नका, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. (Manoj Jarange)
भारतात सर्वात जुना ओबीसी हा मराठा
“हे मला म्हणत होते की ओबीसीतून मराठा आरक्षण मागितलं तर दंगली होतील. मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यामूळे कुठे दंगली झाल्या नाही. या शेकडो वर्षांच्या मराठ्यांच्या नोंदी असून, भारतात सर्वात जुना ओबीसी हा मराठा समाज आहे. आमच्या नोंदी असूनही तुम्ही आम्हाला ओबीसीत येऊ नका म्हणता. (Manoj Jarange)
Manoj Jarange | जरांगेंनी बोलावली बैठक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम