Gold Silver Price 24 May 2024 | गेल्या मार्च एप्रिलपासून सोने चांदीने दरवाढीचे सत्र सुरू केले असून, हे मौल्यवान धातू ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. दरम्यान, गेल्या कित्येक दिवसानंतर या आठवड्यात सोने चांदीच्या दरांत काहीशी नरमाई पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांत सोन्यात २ हजारांची घसरण झाली आहे. त्रा, सोन्यापेक्षाही चांदीची घोडदौड मोठी होती. चांदीने थेट लाखाकडे कूच केली होती. मात्र, आता चांदितही मोठी घसरण झाली आहे. बघा काय आहेत आजचे सोने चांदीचे दर… (Gold Silver Price 24 May 2024)
सोन्याच्या दरांत घसरण
या आठवड्यात सोमवारी सोने जवळपास ७५ हजारांवर पोहोचले होते. २० मे रोजी सोन्यात ५०० रुपयांची दरवाढ झाली. तर, २१ मे रोजी ६५० रुपयांची घसरण झाली. २२ मे किंमती स्थिर होत्या. तर, गुरुवारी किंमतीत थेट १,१०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम ७३,५७० रुपये आणि २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम ६७,४५० रुपये असा आहे.
Gold Silver Price 22 May 2024 | सोने चांदीची घसरण थांबली; असे आहेत सोने चांदीचे दर
Gold Silver Price 24 May 2024 | चांदीत घसरण
मागील आठवड्यात आणि या आठवड्यात चांदीत जवळपास १२,००० रुपयांची दरवाढ झाली आहे. चांदीने जवळपास लाखाकडे कूच केली आहे. दरम्यान, अखेर चांदीनेही ग्राहकांना दिलासा दिला असून, २० मे रोजी चांदीत ३,५०० रुपयांची वाढ झाली. तर, २१ मे रोजी १,९०० रुपयांनी चांदी स्वस्त झाली. २२ मे रोजी १,२०० रुपयांनी चांदी महागली. २३ मे रोजी चांदीत प्रति किलोमागे ३,३०० रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९२,५०० रुपये असा आहे.(Gold Silver Price 24 May 2024)
Gold Silver Price 21 May 2024 | चांदीची लाखाकडे कूच; असे आहेत आजचे सोने चांदीचे दर
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,८२६ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,५३४ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,७०९ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,६२० रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,६०३ रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा ९०,०५५ रुपये असा आहे. (Gold Silver Price 24 May 2024)
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम