सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक व खर्डे येथील संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि २६ रोजी सकाळी ९ वाजता खर्डे (ता. देवळा) येथे मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ रोहन दरेकर, डॉ ज्ञानेश्वर फुसे यांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिराप्रसंगी हृदयरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर रुग्णांनी शनिवारी दि ५ मेच्या आत नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा तसेच शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ महेंद्र शिंदे, डॉ मनाली शिंदे यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम