Manoj Jarange | राज्य सरकारने २० फेब्रुवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मनोज जरांगे हे सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम असून, त्यांनी उपोषण सुरू ठेवले होते. दरम्यान, काल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘सलाईनमधून विष देण्याचा कट रचल्याचे आरोप केले. त्यानंतर ते मुंबई येथील फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले होते. काल ते भांबेरी येथे मुक्कामी होते. त्यानंतर त्यांनी आता मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला असून, ते माघारी फिरले आहेत.
त्यानंतर आता मनोज जरांगे हे अंतरवलीत दाखल झाले असून, त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच येथे जमलेल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी तातडीने आपापल्या गावाला जाण्याचे आवाहन केले आहे. काल मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आक्रमक झालेले जरांगे हे सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते. त्यांची तब्येत खालावलेली असल्यामुळे समाजातील लोकांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. (Manoj Jarange)
Manoj Jarange | मनोज जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना
मात्र, त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. ते मुंबईच्या दिशेने निघाले असून, काल रात्री त्यांनी भांबेरी येथे मुक्काम केला. आज सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघणार होते. पण अचानक त्यांनी हा निर्णय मागे घेतला असून, ते आता पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. उपोषणस्थळी पोहचल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्यास सांगितले असून, यानंतर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.(Manoj Jarange)
आम्ही जरांगे पाटलांना एकटं सोडणार नाही…
मनोज जरांगे हे रात्री पाटील भांबेरी गावात मुक्कामी असताना, तिथे त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल होऊ लागले. यावेळी “मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला येऊ नका असे आवाहन केले असले तरी आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही”, अशी आंदोलकांची भावना होती. पण आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पुन्हा माध्यमांशी बोलताना मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले की,”आपण अंतरवाली सराटीत जात असून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत.
Manoj Jarange | तिकडे आरक्षण एकमताने पास अन् इकडे जरांगेंनी सलाईन फेकली
Manoj Jarange | अंबड तालुक्यात संचारबंदी
मनोज जरांगेंचे आंदोलन पाहता आज बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यातमोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जालनाचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज मध्यरात्री एक वाजेपासून अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे.(Manoj Jarange)
जरांगेंचे सहकारी ताब्यात
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सगळ्यात जवळचे विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय श्रीराम कुरणकर याला पोलिसांनी अटक केली असून, गेल्या अनेक वर्षांपासून हा जरांगेंसोबत काम करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम