Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवालीतील ग्रामस्थांचाच विरोध

0
27
Manoj Jarange
Manoj Jarange

जालना :  एकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असून, दुसरीकडे मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ४ जुननंतर उपोषणाची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वीच मोठी बातमी समोर आली असून, यानुसार मराठा आरक्षणाच्या या लढ्यात जरांगेंसोबत असलेल्या अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनीच त्यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. गावकऱ्यांनी उपोषणाला परवानगी देऊ नये, असे पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

त्यामुळे आता जरागेंच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीतच उपोषण करणार की उपोषणसाठीचे ठिकाण बदलणार?, हे पहावे लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा ज्या गावातून पेटला. त्या गावानेच आता मनोज जरांगेंना विरोध केल्याने आंदोलनाची पुढील दिशा काय असेल..? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Manoj Jarange)

Manoj Jarange | विधानसभा निवडणूक लढवणार..?; मनोज जरांगेंची मोठी घोषणा..!

Manoj Jarange | नेमकं प्रकरण काय..?

४ जून जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली असून, उद्या ४ जूनला मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणस्थळी जाऊन उपोषणाला बसण्यापूर्वीच अंतरवाली येथील गावकऱ्यांनी त्यांच्या उपोषणाला उघड विरोध केला असून, आपल्या गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी न देण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) या गावाचे उपसरपंच आणि ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावात होत असलेल्या उपोषणाला उघडपणे विरोध दर्शविला असून, परवानगी देऊ नये, असे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले आहे. तर, या निवेदनावर ७० गावकऱ्यांच्यादेखील सह्या असल्यामुळे आता जरांगे यांचं उपोषण वादात सापडलं आहे.

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय..!

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जनआक्रोश आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी विविध टप्प्यांमध्ये उपोषणेदेखील केली. त्यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर या आंदोलनाला  हिंसक वळण मिळालं आणि मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभर पेटला. यानंतर आता अंतरवाली सराटी येथे ४ जूननंतर पुन्हा मनोज जरांगे हे उपोषण करणार होते. पावसाळा सुरू होत असल्याने उपोषणस्थळी पत्र्याचा मंडप टाकण्यात आला असून यातच आता काही गावकऱ्यांनी त्यांच्या या उपोषणाला विरोध केल्याने याप्रकरणी प्रशासन काय निर्णय घेणार..? हे पहावे लागणार आहे. (Maratha Reservation)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here