Nashik News | लोकसभेनंतर राज्यात लगेचच विधापरिषद निवडणुकीची लढत रंगणार आहे. राज्यातील ४ जागांवर ही निवडणूक होत आहे. यात मुंबई शिक्षक आणि पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा जशी पूर्ण निवडणुकीदरम्यान चर्चेत राहिली. तसेच आता या विधापरिषद निवणुकीत नाशिक शिक्षक मतदार संघदेखील (Nashik Teachers Constituency Election 2024) चर्चेत आहे. सुरुवातीपासूनच येथे अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहेत.
अहमदनगर येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांनीदेखील नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता नाशिक शिक्षक मतदारसंघातील या लढतीची रंगत वाढली आहे.
Vidhan Parishad Election | नाशिकमधून विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र विखे पाटील म्हणाले की, “मला मतदार संघातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावायचे असून, राजकारण विरहित मला येथील शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावून त्यांना अनुदानित करायचे आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरबारी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे माझे प्रयत्न असतील. त्यामुळे मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे यावेळी ते म्हणाले. (Nashik News)
Nashik News | मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली
दरम्यान, यावेळी तुम्हाला भाजपकडून उमेदवारी मिळणार का? यावर राजेंद्र विखे पाटील म्हणाले की, “मी मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्री सर्वांना भेटलो. त्यांना उमेदवारीसाठी मी निवेदनही दिले असून, काम करण्याची संधी देण्याबाबत विनंतीही केली. माझ्यामागे एक मोठा अनुभव असून, एका विद्यापीठाचा कुलपती तसेच २५ वर्ष पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य, पुणे विद्यापीठाचा कौन्सिलिंग सदस्य, असा माझा प्रदीर्घ अनुभव देखील आहे. मी शिक्षकांसाठी अनेक आंदोलनेही केली असून, या निवडणुकीत राजकारणाचा काही एक संबंध नाही. आम्हाला केवळ येथे शिक्षकांच्या समस्या सोडवायच्या आहेत, असे स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिले. (Nashik News)
Vidhanparishad | विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; असा आहे निवडणूक कार्यक्रम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम