Lok Sabha Election Result | ‘इतक्या लीडने मी निवडून येणार’; राजाभाऊंना विजयाचा फुल्ल कॉन्फिडन्स

0
92
Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Result

Lok Sabha Election Result | नाशिक :  १ जून रोजी देशात लोकसभा निवडणुकीसाठीचे (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि विविध माध्यम संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. यानुसार नाशिकमधील (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना विरुद्ध शिवसेना या चुरशीच्या लढतीत राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मशाल चालणार की धनुष्यबाण..? हे येत्या काही तासांत स्पष्ट होईलच. मात्र, निकालाच्या आधीच राजाभाऊ वाजे यांनी मोठा दावा केला असून, विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत असून, प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा तुलेनेने प्रचारासाठी अधिक वेळ मिळाल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. राजाभाऊ वाजे हे ग्रामीण भागातील उमेदवार असल्याने त्यांचा शहरी भागासोबत फारकाही संबंध नव्हता. ही कमकुवत बाजू भरून काढण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला आणि मतदार संघाच्या तळागाळात जाऊन त्यांनी आपला प्रचार केला.(Lok Sabha Election Result)

Nashik News | नाशिकमध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात मोठे बदल

Lok Sabha Election Result | एक लाखाचा लीड मिळणार  

दरम्यान, मध्यमांशी बोलताना राजाभाऊ वाजे म्हणाले की, “आपण मतदानाच्या दिवसापासून ते मतमोजणीपर्यंत कार्यकर्त्यांची आणि पक्षातील काही नेत्यांची भेट घेत या निवडणुकीचा अहवाल घेतला. कुठलीही आकडेमोड करणार नाही. मात्र आपल्याला विजयाची पूर्ण खात्री आहे. उद्याचा निकाल हा माझ्या बाजूनेच लागणार आहे, असा ठाम विश्वास यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला. तसेच उद्याच्या निकालात आपल्याला सिन्नरमधून जवळपास एक लाखाचा लीड मिळेल, तर, शहरी भागातूनही मला बऱ्यापैकी मतदान होणार असल्याने उद्या येणारा निकाल हा माझ्या बाजूनेच असणार असल्याचेही यावेळी राजाभाऊ वाजे म्हणाले.

उद्या यश मिळणार हे नक्की 

मतदारांनी माझ्यावर हा खूप मोठा विश्वास दाखवला असून, आपल्या कार्यकर्त्यांनीही यासाठी जिवापाड मेहनत घेतलेली आहे. या संपूर्ण मेहनतीला नक्कीच यश येईल. या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद मोठा होता आणि अनेक चांगले अनुभवही मिळाले आहेत. मी कुठलीही आकडेमोड करणार नाही. मात्र उद्या यश हे आपल्यालाच मिळणार. हे नक्की असल्याचा विश्वासही यावेळी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी व्यक्त केला.(Lok Sabha Election Result)

Maharashtra Elections | विधानपरिषदेतच महायुतीत फुट..?; मनसे विरुद्ध भाजप लढतीची घोषणा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here