Malegaon News | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गुन्हेगारांवर धडक कारवाया सुरू आहेत. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा पोलिसांकडून उभारण्यात आला आहे. अशातच कारवाईच्या भितीने जवळजवळ 320 गुन्हेगारांनी चांगल्या वर्तवणुकीच्या हमीचे बॉण्ड दिले आहेत.
Malegaon | मालेगावात गोरगरीब तरुणांच्या खात्यांवरून शेकडो कोटींचे व्यवहार; नेमकं प्रकरण काय..?
320 संशयितांनी दिला चांगल्या वर्तवणुकिचा हमी बॉण्ड
आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 90 सराईतांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पर प्रक्रिया पार पडणार असून ही निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी याकरिता पोलिसांनी सराईतांच्या गुन्हेगारी कुंडल्या जमा केल्या होत्या. पोलिसांनी सराईत व उपद्रवींना रडारवर घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. आता या सर्व 320 संशयितांकडून चांगल्या वर्तणुकीच्या हमीचा बॉण्ड घेण्यात आला आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव विभागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 4, 5 व 6 नोव्हेंबर रोजी शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यादरम्यान ग्रामीण पोलिसांनी देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह तलवार, चाकू ही हत्यारे जप्त केली असून गुन्हेगार मोडीत काढण्यासाठी धडक कारवाया सुरूच राहतील. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आत्तापर्यंत 13 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान पोलिसांनी मागील वीस दिवसांमध्ये शहरातून आठ गावठी बनावटीची पिस्तुले व आठ काढतो से जप्त केली आहेत तसेच बारा तलवारी एक चोपर अशा धारदार शस्त्रांनाही ताब्यात घेण्यात आले असून बेकायदा गुटखा विक्री एन डी पी एस गावठी दारू विक्री अशा विविध 34 अवैध धंद्यांवर छापे टाकत पस्तीस जाणार अटक करून तेरा लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम