Maharashtra Congress | ज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी लवकर जावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला

0
12
Maharashtra Congress
Maharashtra Congress

Maharashtra Congress |  राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतंच दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. तसेच, येत्या काही दिवसांतही काँग्रेसचे काही आमदार हेदेखील सत्ताधारी गटात सामील होणार असल्याचे सांगितले जात होते.

त्यातच काल राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना आणि त्यांच्या कन्या आमदार प्राणिती शिंदे यांना भाजपमधून खुली ऑफर देण्यात येत असल्याचे सांगितले. यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती खराब असल्याचे तसेच काँग्रेसला गळती लागल्याचे दिसत होते. दरम्यान, आता यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांना काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी महत्वपूर्ण विधान करत खोचक सल्ला दिलेला आहे.(Maharashtra Congress)

Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्याच्या घरी एसीबीची धाड

ज्यांना सोडून जायचं त्यांनी लवकर जावं.. 

यावेळी “राजकीय पक्षात आम्ही पक्ष किंवा सत्तेसाठी नाही लढत. तर, एक आदर्श विचार टिकवून ठेवण्यासाठी आम्ही या पक्षात काम करतो. काही लोकांना पद दिले नाही, की ते निघून जातात. मात्र, या जाणाऱ्या लोकांमुळे काँग्रेसचे फार काही नुकसान होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस हे सक्षम असून राज्यातून कोणीही जाणार नाही. पक्ष हा एका आदर्शावर काम करत असतो आणि जो कार्यकर्ता या आदर्शावर चालतो. तो कधीही पक्ष सोडून जाणार नाही. असा आमचा विश्वास आहे.

मात्र, ज्यांना जायचंच असेल तर त्यांनी लवकरात लवकर जावं, असा सल्लाही यावेळी राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सहा विभागांत काँग्रेसच्या ‘पीसीसी एक्झिक्यूटिव्ह’ या बैठकांचे आयोजन केले आहे. त्यापैकी पहिली बैठक ही गुरुवारी १८ जानेवारी रोजी अमरावती येथे पार पडणार आहे. दरम्यान, याच बैठकीसाठी रमेश चेन्निथला नागपूर येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.(Maharashtra Congress)

Political | आता महायुती सरकारचा ॲम्ब्युलन्स घोटाळा..?; चौकशीची मागणी

Maharashtra Congress | कोणाला किती जागा हे लवकरच सांगू 

येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी राज्यात या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात नेहमीच बैठका होत असतात. मात्र, यावेळी आम्ही ग्रामीण भागात जाऊन या बैठकांची सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली असून, काही दिवसांतच कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातील. याबाबत अंतिम शिक्कामोर्तब होईल.काही दिवसात अंतिम यादी ही जाहीर करू” असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.(Maharashtra Congress)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here