Skip to content

Political | आता महायुती सरकारचा ॲम्ब्युलन्स घोटाळा..?; चौकशीची मागणी

Political

Political |   सत्ताधिकारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या मैदानात आता विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उडी घेतली आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

दरम्यान, “ॲम्ब्युलन्स मधूनही पैसे खाण्याचा प्रकार हा महायुती सरकारमध्ये सुरु झाला आहे. काही सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवत कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढल्याचे समोर आले आहे. १० दिवस टेंडरची मुदत ठेवलेली होती. ज्यात कामाचे दिवस हे फक्त ६ होते. टेंडरची रक्कम ही वाढवण्यात आलेली होती. सरकार १,५२९ ॲम्ब्युलन्स खरेदी करणार” असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.(Political)

यावेळी ते पुढे म्हणाले की,”एक कार्डिएक सुविधा असलेल्या अँम्ब्युलन्सची किंमत ही ५० लाख रुपये इतकी असते. एका अँम्ब्युलन्स ५० लाख या प्रमाणे १,५२९ अँम्ब्युलन्सचे एकूण ७६४ कोटी ५० लाख रूपये इतके होतात. ८०० कोटी रूपयांत होणाऱ्या या कामासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च करण्यामागे महायुती सरकारमधील या मंत्र्यांची काय योजना आहे हे राज्याच्या जनतेला माहिती आहे. आता हा अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही नेते मंडळींनी सुरू केला आहे. दरम्यान, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Political)

Politics News | अजित दादांनी कोल्हेंना घेरले आणि सुप्रिया ताईंनी ‘चॅलेंज’ दिले

Political | महायुतीचा मोठा घोटाळा – 

कार्डियाक सुविधा असलेली रुग्णवाहिकांची किंमत ही ५० लाखांच्या आसपास आहे. अधिकाऱ्यांनी ४५ दिवस टेंडरची मुदत असताना ती बदलून १० दिवसांची केली. महिन्याचा खर्च हा तब्बल ३३ कोटी इतका असताना आता ह खर्च  ७४ कोटी इतका करण्यात आला आहे. या ठेकेदाराला पुढची १० वर्षे ७४ कोटी इतके रुपये आता मिळणार आहेत. पहिले टेंडर हे परस्पर रद्द केले. आमच्या सरकारच्या काळात ४१ दिवसांची मुदत असायची. आता त्यात बदल केला आहे.

हा ठेकेदार सेवा बरोबर देतो की नाही, याचे चालक बरोबर आहेत की नाही. याची कुठलीही खातरजमा न केलेली नाही. तसेच कुठलीही सरसकट अटही ठेवलेली नाही. क्षमता व गुणवत्तेची तपासणी न करता संबंधित ठेकेदाराला हे काम देण्यात आलेलं आहे. दर वर्षाला आठ टक्के इतकी खर्चवाढ का देण्यात आली. एका मंत्र्यांचा आणि त्याच्या नातेवाईकाची यात समावेश आहे. आम्ही सर्व समोर आणू. मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून य प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.(Political)

Political News | महाविकास आघडीचं ठरलं ?; बघा कोणाला कीती जागा

हे गेंड्याच्या कातडीचं सरकार

हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. सत्तेतले हे तिन्ही पक्ष मिळून सामूहिक पद्धतीने हे सर्व घोटाळे करत आहेत. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.(Political)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!