Sports festival | सोमनाथ जगताप – देवळा | वाढत्या आधूनिरीकरणामुळे आजकालची पिढी ही मैदानी खेळ तर अगदी विसरून गेल्याचं चित्र सध्या पहायला मिळत असून तरूण पिढीली खेळाची आवड करून देण्यासाठी एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे ता. देवळा येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Sushilkumar Shinde | मोठा गौप्यस्फोट..! माजी मुख्यमंत्र्यांना भाजपची ऑफर
दरम्यान, खेळामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासा बरोबरच मानसिकतादेखील प्रबळ बनते असे प्रतिपादन एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष संजय देवरे यांनी केले. एस.के.डी. चारिटेबल ट्रस्ट संचलित, एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे ता. देवळा येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते प्रतिपादन करत होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव मीना देवरे, प्राचार्य पाटील एस. एन. उपस्थित होते.
Political | आता महायुती सरकारचा ॲम्ब्युलन्स घोटाळा..?; चौकशीची मागणी
यावेळी सूत्रसंचालन प्राथमिक विभाग प्रमुख शोभा जाधव आणि अजय बच्छाव यांनी केले.
Sports festival | यात पूर्व प्राथमिक विभागासाठी
- अम्ब्रेला रेस,
- रनिंग,
- बुक बॅलन्सिंग,
- लेमन स्पून,
- म्युझिकल चेअर.
तर प्राथमिक विभागासाठी
- रनिंग बुक रेस,
- हार्डल रेस,
- डंबेल्स रेस,
- टग ऑफ वॉर,
- थ्री लेग रेस,
- म्युझिकल चेअर.
आणि माध्यमिक विभागासाठी फुटबॉल,
- हॉलीबॉल,
- कबड्डी,
- टग ऑफ वॉर,
- 100 मीटर रनिंग,
- 200 मीटर रनिंग,
- 400 मीटर रनिंग,
- 100*4 रिले या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेसाठी विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख मुदसर सय्यद, क्रीडाशिक्षक धनंजय परदेशी, राजू देवरे, सारिका शिंदे, बबलू देवरे, सागर कैलास यांनी विशेष परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम