Deola Development | देवळा येथे प्रारूप विकास आराखडा बैठक संपन्न

0
3
Deola Development
Deola Development

Deola Development | सोमनाथ जगताप – देवळा | देवळा शहराची प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम सुरू असून जमिनीचे नकाशे, शहरासाठी लागणाऱ्या सुविधा, त्यासाठी करण्यात येणारे आरक्षण यावर जनतेचे मत जाणून घेत शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय नगर विकास विभाग नाशिक यांनी घेतला आहे.

आता या कामी सर्वांचे मत जाणून घेण्यात येईल आणि त्यानुसारच आराखडा तयार करण्यात येईल. त्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना दोन दिवसात मांडाव्यात त्यानंतर प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती नगर रचनाकार रणजीत तनपुरे यांनी दिली.

Sports festival | एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन

Deola Development | शहराची प्रारुप विकास योजना तयार करण्याचे काम सुरु

देवळा शहराची प्रारुप विकास योजना तयार करण्याचे काम सुरु असून विकास योजनेच्या अनुशंगाने नगररचना संचालनालयाच्या तरतुदीनुसार प्रस्तावित जमीन वापर नकाशा तयार करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांशी विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना विचारात घेण्याबाबत सूचित केले होते. त्या अनुषंगाने या संदर्भात नगररचना अधिकारी तथा सहाय्यक संचालक, नगर रचना (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी सुराणा नागरी सहकारी पतसंस्था, देवळा यांच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

Political | आता महायुती सरकारचा ॲम्ब्युलन्स घोटाळा..?; चौकशीची मागणी
यावेळी भाजप पक्षाचे नाशिक लोकसभा अध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, नगररचनाकार कौस्तुभ भावे, शुभम उगले, रणजीत भालेराव, गणेश मुळे, अपूर्वा डोळे, आशिष महाजन, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, किशोर आहेर, अशोक आहेर, सुनंदाबाई आहेर, कैलास पवार, नितीन शेवाळकर, शिला आहेर, रत्ना मेतकर, रवींद्र मेतकर, बळवंत अहिरराव, स्वप्निल सावंत, स्वप्निल आहेर, नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here