Assembly Election | अखेर विधानसभेचे बिगुल वाजले; ‘या’ तारखेला एकाच टप्प्यात होणार मतदान

0
30
#image_title

Breaking News | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धुमाळी उठली होती. सर्वच राजकीय पक्ष यासाठी कंबर कसून तयारीलाही लागले होते. आता अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचे समोर आले आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

Assembly Election | राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागू होणार?; मंत्रालयातील हालचालींना वेग

26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेची मुदत संपणार

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतलात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून ही पत्रकार परिषद राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडत आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेची मुदत संपणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सध्या 9 कोटी 3 लाख मतदार असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली असून सर्व बूथवर सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले तसेच, ज्या मतदारांना केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नाही, त्यांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

– अधिसूचना – 22 ऑक्टोबरला जाहीर होणार

– अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर

– अर्जाची पडताळणी – 30 ऑक्टोबर

– अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 4 नोव्हेंबर

– मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर

विधानसभा निकाल – 23 नोव्हेंबर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here