Assembly Election | राज्यात उद्यापासून आचारसंहिता लागू होणार?; मंत्रालयातील हालचालींना वेग

0
106
#image_title

Assembly Election | लोकसभा निवडणुकीनंतर राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून राज्यभरात विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्यात विधानसभा निवडणूका लांबणीवर पडल्यामुळे तिच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता आचारसंहिता कधीपासून लागू होईल या संदर्भात मोठी माहीती समोर आली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.

Assembly Election | ‘महायुतीत 70 टक्के…’; जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे मोठे विधान

आज पुन्हा मंत्रिमंडळ बैठक पार पडणार

निवडणूक आयोग उद्या पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता असून मंत्रालयात हालचालींना वेग आला आहे. सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून रविवारी सुट्टी असताना देखील सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. आज पुन्हा सकाळी 9:30 वाजता मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली असून महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जाण्याचा अंदाज आहे.

Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये आघाडीने युतीला कॉंटे की टक्कर दिली, त्यानंतर युतीने आता विधानसभा निवडणुकांसाठी थेट लोकांशी संबंधित असलेला योजना आणून लोकांना आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची असणार आहे. त्यातच कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते यामुळे मागील आठवड्यात दोन-दोन मंत्रिमंडळ बैठका झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत अधिक निर्णय घेतले जात असल्याचे चित्र आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here