Madhukar Pichad | उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्टोकचा झटका बसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या 9 प्लस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अर्धांग वायू झाला असल्याचा अंदाज
या विषयाचे अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना पहाटेच्या सुमारास राजुर येथील राहत्या घरी ब्रेनस्टोकचा झटका बसला. मधुकर पिचड हे 84 वर्षांचे असून त्यांना उपचारासाठी नाशिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट
दरम्यान, मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. सध्या पिचड कुटुंबीय भाजपामध्ये असून महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांचा राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात होते. मधुकर पिचड त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु, 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना या निवडणुकीत अकोले विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात जाण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम