लग्नाचे आमिष अन् सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी, नशीबी मात्र बलात्कारच

0
3

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : विद्येच माहेरघर असणाऱ्या पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयार करण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थी येत असतात. काहींचे निकाल उत्तम असतात तर काहींना धक्कादायक गोष्टींना सामोर जाव लागत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात फरासखाना पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. पीडित तरुणीने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत आपल्यावर बलात्कार केल्या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर रुपेश राजाभाऊ व्हावळे (वय ३५, रा. परळी वैजनाथ) तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश आणि पीडित तरुणी हे दोघेही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याकरिता पुण्यात आले होते. या दोघांची अभ्यासिकेत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमामध्ये झाले.

आरोपी रुपेशने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा पीडितेने लग्नाबाबत विचारले तेव्हा त्याने तिला लग्नाला साफ नकार देत पीडित तरुणीला बेदम मारहाण केली.

त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रुपेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दाढे हे ह्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here