Skip to content

धक्कादायक ! शिक्षिकेने विद्यार्थीनी सोबत केले असे कृत्य वाचून तुम्हालाही बसेल धक्का


द पॉइंट नाउ प्रतिनिधी : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. त्याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेवरुन दिसून आला आहे. त्यामध्ये प्रेमासाठी हवं ते करणाऱ्या एका शिक्षिकेनं साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. एका महिला शिक्षिकेला आपल्याच विद्यार्थिनीवर प्रेम झालं आणि त्या प्रेमाचं रुपांतर लग्नातही झालं. मात्र त्या शिक्षिकेला यासाठी मोठी किंमत चुकवावी लागली आहे. राजस्थानामधील भरतपूर येथील एका शाळेतील शिक्षिकेनं जे केलं त्यामुळे तिला कौतूकासह ट्रॉलिंगलाही समोर नाव लागतय. शिक्षिकेस विद्यार्थीनीवर प्रेम झालं. त्या दोघींनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र त्या निर्णयाला घरच्यांचा विरोध होता. दोन्ही स्त्रियांचा एकमेकांशी विवाह ही गोष्ट त्यांना झेपणारी नव्हती. अशावेळी काय करावं तिला समजत नव्हत. त्यानंतर तिनं मोठा निर्णय घेतला.

शिक्षिका असून आपण काय करत आहोत आणि त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रसंगांस सामोरे जाव लागेल याची पर्वा त्या शिक्षिकेने केली नाही. त्यामुळे ती आपल्या निर्णयावर ठाम राहून तिने लिंग परिवर्तन करुन घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. कुटूंबियांसाठी तर ही मोठीच धक्का देणारी बाब होती. मात्र आता तिला सरकारी कागदपत्रांमध्ये आपले जेंडर चेंज करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोर जाव लागत आहे. लिंगपरिवर्तन करुन तिने आपल्या विद्यार्थिनीसोबत संसार थाटला आहे.

मीरा नावाच्या शिक्षेकेने आपले लिंग परिवर्तन करुन घेतले आहे. त्या राजकीय माध्यमिक विद्यालय नगलामध्ये क्रीडा शिक्षिका आहे. त्याच गावात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीशी त्यांनी लग्न केलं आहे, सुरुवातीला घरच्यांचा तीव्र विरोध होता. मात्र अखेर मीराच्या हट्टामुळे त्यांनी त्या लग्नाला परवानगी दिली आहे. मीरानं २०१९ मध्ये जेंडर बदलण्याचा निर्णय घेतला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!