Skip to content

बेवड्यांची काळजी चोरट्यांना; ४३ लाखांचा बिअर बॉक्सची चोरी, १० जणांना अटक


राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
घोटी दरोडा प्रकरणी कन्टेनर ड्रायव्हरला बेशुध्द करून कंटेनर व बियरचे बॉक्स लुटमार करणारी टोळी जेरबंद करुन १० आरोपींना गजाआड केले असुन गुन्हयातील वाहनांसह कन्टेनर व बियरचे बॉक्स २४ तासात हस्तगत करण्यात नाशिक ग्रामिण पोलीसांना यश आले आहे. या दरोड्या प्रकरणी कंटेनर चालक मोहमद साजिद अबुलजैस शेख, वय २२ वर्ष, राहणार आजमगड, उत्तरप्रदेश याने घोटी पोलीस ठाण्यात दिनांक ५ ऑक्टोबर रोजी फीर्याद दिल्याने भादवी कलम 395, 343, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयात आरोपींनी फिर्यादीचा कन्टेनर नंबर एम. एच. 43 बी. जी. 5463 मध्ये गंगापुर जि. औरंगाबाद येथुन बसुन सिन्नरच्या पुढे आल्यावर शिवीगाळ, दमदाटी करुन कंन्टेनर नाशिकरोड व सिन्नर असा फिरवुन आणुन सिन्नर घोटी रोडला एच. पी. पेट्रोलपंपाजवळ उभा करुन आर्टिका गाडी नंबर एम. एच. 04 एफ. एफ. 6351 मधुन आलेल्या आणखी काही साथीदारांनी फिर्यादीला बेशुध्द करुन त्याचे ताब्यातील कंन्टेनर व त्यातील किंगफिशर बियरचे २२०० बॉक्स घेवुन जावुन फिर्यादीस नाशिक येथे डांबुन ठेवुन, पुन्हा हरसुल जवळ एका ठिकाणी घेवुन जावुन कन्टेनर मधील बियरचे बॉक्स खाली करुन २० लाख रुपयाचा कंन्टेनर व 43,29,856/-रुपयाचे किंगफिशर 2200 बियरचे बॉक्स असा एकुण 63,29,856/-रुपयाचा माल बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले होते.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत असतांना सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान नांदगाव येथे बियरच्या बाटल्याचा मोठा साठा शेतामध्ये ठेवलेला आहे अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकुन पिकअप गाडी, बियरच्या बाटल्याचा साठा व आरोपी दिपक बच्छाव यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे सखोल विचारपुस केली असता असाच माल त्याने आरोपी निलेश जगताप याचे सांगणेवरुन मनमाड येथे ठेवल्याचे सांगितले. त्यावरुन मनमाड येथील अस्तगाव या ठिकाणावरुन बियरच्या बाटल्याचा साठा जप्त करण्यात आला.

याच तपासा दरम्यान दुस-या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निलेश जगताप व त्याचा भाऊ यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्हा करण्यासाठी बरोबर असलेल्या इतर आरोपीतांची, फिर्यादीस डांबुन ठेवलेल्या ठिकाणाची माहिती व गुन्हयातील मुद्देमाल त्र्यंबक, हरसुल येथे वाहतुक करण्यासाठी मदत केलेल्या इतर साथीदारांच्या नावांची माहीती दिली. गुन्हयातील किंगफिशर स्ट्रॉग बियरचे बॉक्स, चोरी करण्यासाठी वापरलेला आयशर टेम्पो नं. एम. एच. 15 ई.जी. 8566, पिकअप गाडी एम. एच. 15 एच.एच.8566, आर्टीका गाडी न. एम.एच. 04 एफ. एफ. 6351 तसेच पेठ पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केलेला कंन्टेनर एम.एच. 43 बी.जी.5463 असा एकुण 55,22,936/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तसेच गुन्हा करणा-या १० आरोपीतांना अटक करण्यात आली असुन आतापर्यत एकुण 1054 बियर बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांचे सुचनांप्रमाणे, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे व त्यांचे पथक यासह घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व पोलीस पथकाने गुन्हा दाखल होताच २४ तासात गुन्हयाचा शोध लावुन १० आरोपी गुन्हात वापरलेली वाहने मुद्देमालासह जप्त केली आहे.

अटक केलेल्या सर्व आरोपी निलेश विनायक जगताप, वय ३५, आकाश उर्फ सोनू विनायक जगताप, वय ३२, दोघे राहणार भारत भूषण सोसायटी, प्लॉट न. ४४, पवारवाडी, जेलरोड, नाशिकरोड, चेतन अशोक बिरारी, वय ३२ राहणार जे. के. इनक्लु फ्लॅट न. १०४ आर.टी.ओ. आफीस जवळ, पंचवटी, नाशिक, दिपक शिवाजी बच्छाव वय ३१, महेश शिवाजी बच्छाव वय २८ दोघे राहणार घर न. १५५, त्रिमुर्तीनगर, हिरावाडी पंचवटी, नाशिक, विकास उर्फ विकी भिमराव उजगरे, वय २६ रा. बिल्डींग नंबर बी ४, रुम नंबर डी ६०, घरकुल चिंचोळे शिवार, अंबड, नाशिक, धिरज रमेश सानप, वय ३०, रा. स्वप्नपुर्ती अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर ३०२, मानसे कंपाऊंड, मनमाड, ता. नांदगाव, गणेश निंबा कासार वय ३८ रा. घर नंबर ५९५, मुक्तांगण गार्डेन, मनमाड ता. नांदगाव, जि. नाशिक, मनोज उर्फ पप्पु शांताराम पाटील, वय ३२ रा. एन, एल. ए ६-४२/१ गणेश चौक, सिडको नाशिक यांना इगतपुरी न्यायालयात आज हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याच्या शोध मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक शशिकांत गर्जे, उपनिरीक्षक सुनिल देशमुख व पथकाचे देखील सहकार्य लाभले अशी माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली असुन सदर कामगिरी बाबत कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करुन १५ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!