Loksabha Election | २०२४ हे निवडणुकांचे वर्ष असून, आता कुठल्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात, अशी स्थिती असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आपापल्या पक्षांना बळकटी देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर, जागावाटपाच्या सूत्रावरून दोन्ही गटांत रस्सीखेच सुरू असल्याचेही दिसतेय. यातच काही नेते हे त्यांच्या सोयीनुसार पक्षांची हेराफेरी करत असून, काही पक्षांना गळती तर, काहींना बळकटी मिळत आहे. दरम्यान, यातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकांच्या बाबतीत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. (Loksabha Election)
“आता आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत”, या शब्दांत जणू त्यांनी रणशिंगच फुंकल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग तयार असल्यामुळे लोकसभा निवडणूका पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती आखावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षांपासून ते विरोधी पक्षांपर्यंत सर्वच प्रचाराला लागले असून, या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतेच नाहीतर, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा अनेक राज्यांचे दौरे करत आहेत.
Loksabha 2024 | काँग्रेसकडे बिल भरण्यासाठीही पैसे नाही; ब्लॉक झाला सर्व पैसा
या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची राजकीय पक्षच नाहीतर, संपूर्ण देश वाट पाहत आहे. दरम्यान, आता त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. तर, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखांबाबत महत्वाची माहिती दिली असून, “आम्ही निवडणुकींसाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच निवडणुका जाहीर होऊ शकतात. (Loksabha Election)
Loksabha Election | काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त..?
काल निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकींबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की,”निवडणूक आयोगाच्यावतीने मी सांगू इच्छितो की, आम्ही निवडणुकांसाठी तयार आहोत व त्यासाठीची सर्व तयारी देखील पूर्ण झालेली आहे. आम्ही ओडिशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुका घेण्यास तयार आहोत”. (Loksabha Election)
Loksabha | राम मंदिराच्या चर्चेदरम्यान लोकसभेत ‘बाबरी मशीद झिंदाबाद’चे नारे
सात ते आठ टप्प्यात मतदान
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विधानामुळे आता निवडणूक आयोग हे मार्चमध्ये लोकसभा निवडणुकींची घोषणा करू शकतात. अधिक माहितीनुसार, एप्रिल किंवा मे महिन्यात सात ते आठ टप्प्यात यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे. तर, मे महिन्यातच या निवडणुकीचे निकाल देखील जाहीर होऊ शकतात. १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०१४ रोजी संपत असल्याने त्यापूर्वीच नवी लोकसभा ही अस्तित्वात येणार आहे.
२०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ९ टप्प्यात मतदान झाले होते. तर, २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ टप्प्यात मतदान झाले होते. दरम्यान, यावेळी कायदा व सुव्यवस्था, संसाधनांची उपलब्धता तसेच इतर अनेक बाबी लक्षात घेऊन यावर्षी लोकसभा निवडणुका किती टप्प्यांत घ्यायच्या याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. (Loksabha Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम