Deola | देवळा सायकलिस्टची देवळा ‘शिवस्मारक ते शिवनेरी किल्ला’ सायकल राईड

0
66
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  ‘देवळा सायकलिस्ट असोसिएशन’च्या वतीने शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ देवळा अशी सायकल राईड करण्यासाठी देवळा सायकलिस्टचे चार सदस्य यांना देवळा येथील शिवस्मारक येथून आज हिरवा झेंडा दाखवून निरोप देण्यात आला. सायकलने प्रवास करणारे देवळा सायकलीस्टचे सदस्य पंकज जाधव (देवळा), राकेश आहेर (मटाने), मिलिंद निकम व पुंडलिक निकम (विठेवाडी)आदी सदस्य देवळा येथून रवाना झाले. देवळा सायकलीस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या सायकल राईडला सुरुवात करण्यात आली.

Loksabha Election | लोकसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

या सदस्यांनी आज शिवनेरी वरून माती व पाणी घेत दुपारी देवळा कडे प्रस्थान केले. आरोग्याचा मंत्र देत सायकलिस्ट चळवळ वाढीसाठी शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी ही २६९ किमीची राईड करणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले. आज संध्याकाळी देवळा शहरात हे सायकलिस्ट जलतीर्थ घेऊन शिवनेरी ते देवळा शिवस्मारक यात्रा संपन्न करतील. देवळा शिवतीर्थावरील शिवस्मारकास माती व जल अर्पण करत यावेळी यात्रा संपन्न करणार आहेत. याप्रसंगी देवळा सायकलीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पवार, सदस्य डॉ. नंदकुमार आहेर, गणपत पवार, राजू कानडे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here