Horoscope 18 February | आजकालच्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध होत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आपल्या ग्रहांच्या प्रभावामुळे घडत असतात. राशिभविष्य हे ग्रहांच्या हालचाली लक्षात घेऊन पंचांगाच्या आधारे केलेले भाकीत होय. शुभ कार्यासाठी आज दोन मुहूर्त आहेत. हे सकाळी १०.१५ ते १२.१५ पर्यंत अमृताची चौघडीया मुहूर्त आहे. तर, दुपारी २.०० ते ३.०० पर्यंत शुभ चौघडीया हे. दुपारी ४.३० ते ६.०० वाजेपर्यंत राहु काळ असेल. तर जाणून घेऊयात की, आजचा १८ फेब्रुवारी रविवारचा दिवस हा सर्व १२ राशीच्या लोकांसाठी कसा जाईल. वाचा आजचे राशीभविष्य…
मेष राशी –
चंद्र हा मेष राशीच्या दुस-या घरात असल्यामुळे आज तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेची काळजी घ्याल. व्यावसायिकांना तुमच्या व्यवसायात अचानक तेजी दिसू शकते. तसेच व्यवसाय वाढवण्याबद्दल नवीन कल्पना येऊ शकतात. नोकरदार वर्गाचे लोक कामाच्या ठिकाणी वादात अडकू शकता. तुमचा जोडीदारासोबत आज आनंदाचे क्षण घालवू शकतात. विद्यार्थ्यांना आज शिक्षणात फायदा होईल. त्यांचे काही प्रयत्न फलदायी ठरतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुमचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.(Horoscope 18 February)
वृषभ राशी –
चंद्र आज वृषभ राशीत असल्यामुळे तुमचे मन शांत आणि आनंदी राहील. व्यावसायिकांच्या व्यवसायात सुधारणा होतील. आज अपेक्षित लाभाचा आकडा गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मात्र, आज कुठलेही काम घाईघाईने करणे टाळा. कुठलाही मोठा निर्णय घेताना कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला हा तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करावे लागतील. तुमच्या जोडीदाराच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमची काही अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला सर्दी, तापाची समस्या होऊ शकते. तर, आजच्या या लक्ष्मीनारायण योगामुळे सामाजिक व राजकीय स्तरावर तुमचे जीवन सुधारेल.
मिथुन राशी –
चंद्र हा मिथुन राशीच्या १२व्या भावात असल्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते. व्यापार, शेअर बाजारात तुम्हाला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. व्यावसायिकांनी जरा सावध असावे. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्या येऊ शकतात. तर, राजकीय क्षेत्रातील लोकांनी अनावश्यक वादांपासून दूर राहावे. नोकरदार लोकांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी सौम्यपणे वागावे. आज कुटुंबात काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला नसेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, पोटाचे काही त्रास जाणवू शकतात. (Horoscope 18 February)
Horoscope 4 February | ‘या’ लोकांनी आज सावध असावे; वाचा आजचे राशीभविष्य
कर्क राशी –
चंद्र ह कर्क राशीच्या ११ व्या भावात असेल्यामुळे नफा वाढु शकतो. तर, लक्ष्मीनारायण योग तयार झाल्यामुळे व्यावसायिकांच्या उत्पादनांची विक्री चांगली होईल. मात्र, तुम्हाला तुमच्या नियोजनाकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये तुम्ही तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही कामात प्रगती करू शकतात. नोकरदार लोक त्यांच्या पगार व ऑफिसमधील कामाबद्दल असमाधानी असाल. तर, तुम्ही आज नवीन नोकरीचा शोध घेऊ शकतात. आज वाईट शब्दांच्या बाणांनी आपल्या जोडीदारास किंवा कुटुंबीयांना दुखवू नका. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. देवी पार्वतीची आराधना करा, शरणं गौरी नारायणी नमोस्तुते । एका मंत्राचा जप करा. (Horoscope 18 February)
सिंह राशी –
सिंह राशीच्या दशम भावात चंद्र असल्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकू शकाल. तुमचा व्यवसाय अधिक उंचीवर नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर, लक्ष्मीनारायण योगामुळे, कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तसेच, वरिष्ठांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यावसायिकांना व्यवस्थापन क्षमतांचा वापर करावा लागेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, डोळ्यांच्या जळजळीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल. जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता. तसेच आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्यायला हव्यात. (Horoscope 18 February)
Horoscope 18 February | कन्या राशी –
कन्या राशीच्या नवव्या भावात चंद्र राहील असल्यामुळे आज आध्यात्मिक कार्य होतील. व्यावसायिकांच्या व्यवसायातील आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायातील आर्थिक बाबींबाबत तुम्ही अधिक सक्रियपणे काम कराल. तसेच, लक्ष्मीनारायण योगामुळे तुमच्या व्यवसायाचे नाव वाढेल. याचा फायदा तुमच्या उत्पादनांच्या विक्रीवरही होईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा खराब करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा नातेसंबंधात तुमच्या जोडीदाराबद्दल तुमची चिंता वाढू शकते. आरोग्याबाबत हलगर्जीपणा केल्याने तुम्हाला अन्नातून काही आजार होण्याची शक्यता आहे.(Horoscope 18 February)
तूळ राशी –
तूळ राशीच्या चंद्र आठव्या भावात असल्यामुळे प्रवासात अडचणी येऊ शकतात. व्यावसायिकांना काही कारणांमुळे व्यवसायात नुकसान सहन करावे लागेल. तसेच आज जरा तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे. व्यवसायाशी संबंधित कुठलेही मोठे खर्च करू नये. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित संधी मिळणार नाहीत. कुटुंबातील काही गैरसमजामुळे तुमचे आज वाद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात किंवा नातेसंबंधात आज काही तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, जास्त धावपळ केल्यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवेल.(Horoscope 18 February)
वृश्चिक राशी –
वृश्चिक राशीच्या चंद्र सप्तम भावात असल्यामुळे पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होईल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात विक्री वाढवण्यासाठी आळस दूर करावा लागेल. तुम्हाला आज एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यशैलीमुळे सर्व सहकारी प्रभावित होतील. जोडीदारासोबत आजचा दिवस मजेत जाईल. खेळाडूंचे आरोग्य आज खराब असेल. त्यामुळे त्यांनी आरोग्याबाबत सावध रहावे.
Horoscope 3 February | ‘या’ लोकांनी नात्यात प्रामाणिक राहावे; वाचा आजचे राशीभविष्य
धनु राशी –
धनू राशीच्या चंद्र सहाव्या भावात असेल ज्यामुळे शारीरिक तणावातून आराम मिळेल. लक्ष्मीनारायण योग तयार होत असल्याने व्यवसायात ग्राहकांचा कल तुमच्याकडे वाढेल. तुम्ही घेतलेले काही निर्णय हे तुमच्या व्यवसायात भरभराट आणतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. खर्च वाढतील ते आटोक्यात ठेवा. आज तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटता येईल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याची योजना तयार करू शकतात. आरोग्याबद्दल बोलायचे तर, नियमित व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल. (Horoscope 18 February)
मकर राशी-
मकर राशीच्या चंद्र पाचव्या भावात असल्याने पालकांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. तर, लक्ष्मीनारायण योग तयार झाल्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्ही काही नवीन प्रयोग करू शकतात. आर्थिक बाबतीत एकूणच तुमचा दिवस हा अनुकूल आहे. नोकरदार वर्गाचा कामाचा ताण कमी झाल्यामुळे तुम्हाला थोडा आराम वाटेल. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंधांमध्ये, इतरांच्या प्रेम प्रकरणांचा प्रभाव तुमच्यावर असू शकतो. प्रेम आणि जोडीदारासोबत आज रोमँटिक वेळ घालवू शकतात. आरोग्याबद्दल बोलायचे तर, अपघाती इजा होऊ शकतात. त्यामुळे सावध असा आणि ऑपरेशन्स किंवा मोठे उपचार घ्यायचे पुढे ढकलू नका.
कुंभ राशी –
चंद्र हा कुंभ राशीच्या चौथ्या भावात राहील आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. व्यावसायिकांना कर्ज घ्यावे लागू शकते. व्यवसायात अनावश्यक खर्च होऊ शकतो. नोकरदार वर्गाच्या लोकांकडून कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत एखादी चूक होऊ शकते. वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंधात काही वाद होऊ शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होईल. प्रेम व जोडीदाराच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावा लागेल. आरोग्याबद्दल बोलायचे तर, प्रवासामुळे आज तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.(Horoscope 18 February)
मीन राशी –
चंद्र हा मीन राशीच्या तिसऱ्या भावात असल्यामुळे तुमच्या संगतीमुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तर, लक्ष्मीनारायण योगामुळे तुमचे व्यावसायिक प्रकल्प हे वेळेत पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळविण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन व प्रेम संबंधातील संघर्ष टाळण्यासाठी, काही समाधानकारक धोरणे स्वीकारावीत. प्रेम आणि वैवाहिक जीवनातील तणावपूर्ण स्थिती संपेल. मात्र, तुमच्या जोडीदाराला वेळ द्यावा. कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी शॉर्टकट घेऊ नका. सामाजिक आणि राजकीय स्तरावर जोडीदाराच्या सहकार्याने तुमच्या कार्यात प्रगती होईल. आरोग्याबद्दल बोलायचे तर, ज्या लोकांना ऍलर्जी किंवा न्यूरोलॉजिकल समस्या असतील त्यांनी सावधगिरी बाळगावी. तसेच खाण्या-पिण्यावर लक्ष द्यावे.(Horoscope 18 February)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम