Ladki Bahin Yojna | नाशिकमध्ये लाडक्या बहीणींचे अर्ज लाखाच्या वर; ग्रामीण भागातील महिलांची आघाडी

0
78
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna : नाशिक |  या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यानंतर राज्यातील महिला वर्गात एकच उत्साहाचे वातावरण पसरले असून, योजनेच्या नोंदणी प्रक्रियेस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांवर रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार असून, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रच महिलांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. (Ladki Bahin Yojna)

दरम्यान, या योजनेच्या नोंदणीसाठी महिलांनी सेतु कार्यालय, सायबर कॅफे, इ. ठिकाणी मोठी गर्दी केली असून, नाशिक शहरातील तब्बल एक लाख ९८ हजार ८९९ महिलांनी आतापर्यंत आपले नोंदणी अर्ज भरले आहेत. तर, योजनेच्या अर्ज नोंदणीसाठी ५,७९७ मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी याबाबत माहिती दिलीय आहे. (nashik news)

Ladki Bahin Yojna | लाडक्या बहिणींचा त्रास कमी होणार; योजनेचा लाभ घेणे आणखी सोप्पे

Ladki Bahin Yojna |  ग्रामीण भागातून अधिक अर्ज 

जिल्हाभरात ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र, सेतू केंद्र या सर्व एकत्रित माध्यमातून एकूण ५, ११५ मदत केंद्रे उभारण्यात आली असून, या केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ७२३ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात ९८ मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून, या केंद्रांमधून आतापर्यंत २९ हजार ६९ अर्ज प्राप्त झाले असून, अंगणवाडी शहरी प्रकल्पाच्या माध्यमातून ५८४ मदत केंद्रांतर्गत ३९,१०७ अर्ज प्राप्त झाले आहे. वैयक्तिकरित्या नोंदणी केलेल्या अर्जांचा यात समावेश नसताना ही संख्या आहे. दरम्यान, या प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojna | महाराष्ट्रातील महिलांना मिळणार प्रतिमाह १,५०० रुपये; तीन गॅस सिलिंडर मोफत 

३१ ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी मुदत 

‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने हि योजना सरकारकडून राबवली जात असून, महिलांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अजूनही ज्या महिलांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या जवळील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वॉर्ड कार्यालय, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथील मदत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक शहर विभागीय आकडेवारी 

  1. नाशिक पूर्व – १,२१०
  2. नाशिक पश्चिम – २,८१४
  3. पंचवटी – ३,८३६
  4. सातपूर – ८४५
  5. नाशिकरोड – २,१२६
  6. नवीन नाशिक – ६,८४७

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here