Ladki Bahin Yojna | सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे; अदिती तटकरेंनी दिली माहिती

0
64
#image_title

Ladki Bahin Yojna | राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. ज्याचा राज्यातील अनेक महिलांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर कोट्यावधी महिला या योजनेकरिता पात्र देखील ठरल्या आहेत. तसेच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमादेखील झाले आहेत. माझी लाडकी बहीण योजना जूनमध्ये घोषित करण्यात आली होती आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ऑगस्ट 1 पर्यंत देण्यात आली होती मात्र ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली त्यानंतर आता माझी लाडकी बहिणी योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे? त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या महिलांनी अर्ज भरले आहेत त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये कधीपर्यंत जमा होतील? या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana | ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या लाडक्या बहिणींना ‘या’ तारखेला मिळणार पैसे; अदिती तटकरेंनी दिली माहिती

काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणखीन विस्तारीत जाणार का? असा प्रश्न विचारला असता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी “मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्टमध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला.” अशी माहिती तटकरेंनी माध्यमांशी बोलताना दिली.

तसेच, सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू असून ती छाननी पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील असा अंदाज आहे. अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”असे देखील त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Ladaki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना ओवाळणी अन् आशा सेविकांना आश्वासनं; बघा नेमकं प्रकरण काय..?

कधीपर्यंत भरता येणार लाडकी बहिणी योजनेचा अर्ज

पहिल्या टप्प्यातील मुदत 1 जुलै ते 1 ऑगस्ट होती. या कालावधीतील पात्र महिलांनी अर्ज भरले त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला. तर काहींना मिळणार आहे. तसेच या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या प्राप्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा देखील आम्ही लाभ लवकरच वितरित करणार आहोत. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरले आहेत, त्यांना देखील लाभाची सुरुवात या महिन्यात होईल सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो लाभपात्र महिलांना लवकरच वितरित करण्यात येईल.” अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here