Deola | खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेत गावात यंत्राद्वारे धुरळणी करण्यात आली

0
18
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यात खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने वाढत्या डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेता गावात यंत्राद्वारे धुरळणी करण्यात आली. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याकामी आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. पावसामुळे डबक्यात पाणी साचणे तसेच खर्डे गावात मोकळ्या व पडझड झालेल्या घरांभोवती गवताचे साम्राज्य वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंग्यु सदृश्य रुग्णांच्या तसेच इतर साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसून येत आहे. याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभाच्या वतीने ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर कीटकनाशक फवारणी, स्वच्छता आदी उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, विस्तार अधिकारी राजेश निकुंभ यांनी दिली होती. आरोग्य सेवक, आशा वर्कर यांनी गावात घरोघरी जाऊन पाहणी करून स्वच्छता बाळगण्याचे आवाहान केले आहे.

Deola | उमराणेत बुधवारी आ. कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा; राजकीय दृष्ट्या विशेष महत्व

डेंग्यूचा उद्रेक थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना

आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायतीला किटकशास्त्रीय व कंटेनर सर्वेक्षण करावे, गावातील परीसर स्वच्छ ठेवावा, आपल्या स्तरावरुन, अबेटिंग, फॉगींग मशिन उपलब्ध करुन धुरफवारणी करावी जेणेकरुन करुन डासाची घनता कमी होईल, गावातील डासोत्पत्ती स्थाने शोधुन नष्ट करणे, तुंबलेल्या गटारी, नाले वाहते करावीत, सखल भागात पाण्याचे डबके साचू नये म्हणून उपाययोजना करावी, वापरात येणा-या पाण्यात टेमीफॉस द्रावण टाकुन डास आळ्या नष्ट करावीत, मोठ्या पाणीसाठ्यामध्ये गप्पी मासे सोडावेत, आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात डेग्यु उद्रेक होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here