Ladaki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना ओवाळणी अन् आशा सेविकांना आश्वासनं; बघा नेमकं प्रकरण काय..?

0
38
#image_title

Ladaki Bahin Yojana : सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकायांच्यावरती मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यात नागपूर शहरात डेंग्यू चिकनगुनिया सारखे आजार फोफावत असून रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तेव्हा या कामात आशा सेविकांची जबाबदारी जास्त असताना, त्यांना लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मेळाव्याच्या कामासाठी जबरदस्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशा सेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते आहे. यामुळे आशा सेविकांकडून सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला जात आहे.

Manoj Jarange | ‘बहिणींना पैसे दिलेत मात्र…’; मनोज जरांगेंनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा सरकारला डिवचले

Ladaki Bahin Yojana | मानधनाचे आश्वासन अपूर्ण. 

राज्य सरकारकडून आशा सेविकांना मासिक 7000 व गटप्रवर्तकांना दहा रु. मानधन देण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु अजूनपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नसल्याकारणाने (C. I. T. U) म्हणजेच आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन तर्फे बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर दिवाळी बोनस आणि इतर आश्वासना देखील अपूर्ण असल्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. अशी भूमिका घेत सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Supreme Court | ‘अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करा’; सुप्रिम कोर्टाने सरकारला सुनावले

नागपुरात पार पडणार लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम

जुलै महिन्यात राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा पुणे येथे पार पडला. त्यानंतर आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाकरिता विदर्भातील कानाकोपऱ्यातून लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असून आशा सेविकांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here