Kojagiri 2023 | स्वयंभू आद्यशक्तिपीठ सप्तशृंगी गडावर कोजागरी पौर्णिमा उत्सव आणि देशातील प्रमुख कावड यात्रेपैकी एक तसेच राज्यातील सर्वांत मोठी कावडयात्रा शनिवारी (ता. २८) होते आहे. याच दिवशी दरवर्षी तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक मोठ्या उत्साहात निघत असते. दरम्यान, यंदादेखील राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील हजारो कावडधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झालेले आहेत. आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगळवारी (ता. २४) उत्साहात सांगता झालेली आहे. या नंतर भाविकांना शनिवारी (ता. २८) होणाऱ्या कावडयात्रेची आस लागलेली आहे.
Baba Maharaj Satarkar| वारकरी संप्रदाय हळहळला; बाबा महाराज सातारकर यांचं निधन…
गडावर चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच कोजागरी पौर्णिमा उत्सव (कावडयात्रा) होत असतो. चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच भाविकांची या यात्रेसाठी दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. चैत्रोत्सवाप्रमाणेच कोजागरी पौर्णिमा आणि कावड यात्रेसाठी पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांवर असते. त्यात हजारो कावडधारक पुणे येथून मुळा नदीचे साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोद या ठिकाणाहून तापीचे, ओंकारेश्वर, इंदूर येथून नर्मदा नदीचे तीर्थ, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ, भीमाशंकर येथून भीमा नदी आदी ठिकाणांहून चारशे ते सहाशे किलोमीटरहून अनवाणी प्रवास करून गडापासून सुमारे दीडशे ते दोनशे किलोमीटरपर्यंत दाखल झालेले आहेत.
दिंडोरी तालुक्यासह जिल्हाभरातून हजारो कावडधारक रात्री उशिरापर्यंत त्र्यंबकेश्वर येथून रवाना झाले असून, ते आज आणि उद्यापासून गडाकडे कुशावर्तावरून कलश भरून मार्गस्थ होणार आहे. तसेच नाशिक येथून रामकुंडातूनही हजारो कावडधारक गुरुवारी तसेच शुक्रवारी गोदावरीचे जल घेऊन सप्तशृंगी गडाकडे कूच करतील.
Nashik | मेथीच्या जुडीला सोन्याचा भाव; सणासुदिला गृहिणींचं बजेट कोसळणार
नवरात्रोत्सवादरम्यान कार्यरत असलेली प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगीदेवी न्यास आणि ग्रामपंचायतीचीदेखील यंत्रणा कावडयात्रेसाठी सज्ज आहे. शुक्रवार (ता. २७) तसेच शनिवार (ता. २८) नांदुरी-सप्तशृंगीगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद करण्यात येईल. महामंडळानेही नवरात्राप्रमाणेच नांदुरी ते सप्तशृंगीगड यादरम्यान 100 बस, तर नाशिक विभागातील 11 आगारांतून सुमारे 300 बसद्वारे भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन केलेले आहे.
दरम्यान, गडावर येणाऱ्या कावडधारक तसेच पदयात्रेकरूंना विसावा, पिण्याचे पाणी आणि फराळवाटपाबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक ते वणी, मालेगाव, पिंपळनेर, सटाणा, कळवण या रस्त्यांवर अनेक स्वयंसेवी संस्थांनी तयारी सुरू केलेली आहे. रविवारी (ता. २९) सकाळी साडेसातला शांतिपाठ होऊन महाप्रसादाच्या वाटपाने नवरात्रोत्सव आणि कोजागरी उत्सवाची सांगता होईल.
PM Modi | पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा; दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद
कोजागरी पौर्णिमेनिमित्त होणारे विधी कोणते?
- शुक्रवार (ता. २७) अश्विन शु. १४ (पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री ४.१७ मी.) सकाळी सातला पंचामृत महापूजा
- शनिवार (ता. २८) | सकाळी सातला पंचामृत महापूजा
- दुपारी साडेबारा ते रात्री साडेआठपर्यंत कावडधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारले जाणार.
- श्री भगवतीचा रात्री नऊ ते बारापर्यंत जलाभिषेक महापूजा
- रात्री बाराला भगवतीची महाआरती
- रविवारी (ता. २९) सकाळी सातला देवी पंचामृत महापूजा
- सकाळी साडेसातला शांतिपाठ व महाप्रसाद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम