Khichdi Scam | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीपासूनच ठाकरे गटाच्या एकापाठोपाठ एक नेत्यावर ईडीची धाड पडत आहे. आधी आमदार रवींद्र वायकर नंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे त्यानंत आमदार राजन साळवी, सुरण चव्हाण, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आता खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत हे सर्व ठाकरेंचे बडे नेते सध्या ईडीच्या कचाट्यात सापडले असून, त्यांची ईडी चौकशी सुरु आहे.
आज किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची इडी चौकशी सुरू आहे. यावरून संदीप राऊत यांनी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच थेट ईडीवर निशाणा साधला आहे. दरम्यान, यावेळी ते म्हणाले की,” हे मला आजच कळाले की पाच साडेपाच लाखांच्या घोटाळ्यासाठी पण ईडीची चौकशी होऊ शकते. हे ईडीचे काम आहे का? या पद्धतीने खालच्या स्तराला जाऊन चौकशी करून यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे? आणि मुळात घोटाळा काय हेच मला माहित नाही, असे स्पष्टीकरण संदीप राऊत यांनी दिले आहे.(Khichdi Scam)
Sanjay Raut | आरोप करणे त्यांचा ‘धंदा’; संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज
हे विरोधकांना आणि कुटुंबीयांना त्रास देण्याचे उद्योग
राज्यातील सत्ताधारी हे फक्त विरोधकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या राजकारणातील विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देऊन वेठीस धरण्याचे उद्योग हे राज्यात सध्या सुरु आहेत. तुम्ही रामाचं नाव घेता आणि हे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करता. कोणी तुमच्या विरोधात काही बोलले की, त्यांच्या मागे ईडी आणि इन्कम टॅक्सची चौकशी लावायची. लगेच सीबीआयला बोलवले जाते, अशी टीका संदीप राऊत यांनी केली.
Khichdi Scam | सेवेचा आम्हाला असा मोबदला मिळतोय
चुकशीच्या प्रकरणावर बोलताना संदीप राऊत म्हणाले की,”राजीव साळुंखे हे माझे चांगले परिचित असून, त्यांच्याकडे कोविड काळात किचन नव्हते. त्यामुळे तेव्हा त्यांनी माझ्या हॉटेलचे किचन वापरले होते. त्यांच्याकडे साहित्य नव्हते म्हणून, मी ते त्यांना दिले. कोविड काळात कोणीही काम करण्याची हिंमत करत नव्हते. पण आम्ही राज्याच्या जनतेची सेवा केली. आणि त्या सेवेचा आता आम्हाला असा मोबदला मिळत आहे. मात्र, तरीही आमची या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. कारण आम्ही घाबरणारे नाही.(Khichdi Scam)
Uddhav Thackeray | उद्धव साहेब ‘वेट अँड वॉच’ आपलीही वेळ येईल – संजय राऊत
संजय राऊतांनी आरोपींची वाचली नावे
ठाकरे गटाच्या नेत्यानंतर आता स्वतःच्या भावावर सुरू असलेल्या या ईडी चौकशीवरून खासदार संजय राऊत हे आक्रमक झाले आहेत. “आम्ही आता जनतेच्या कोर्टात जाऊ. हे खिचडी घोटाळा म्हणताय, पण ज्यांनी ही कामं केली आहेत. त्याचे कंत्राट आता देवगीरी व वर्षा बंगल्यावर आहेत. राहुल कनाल, अमेय घोले व इतरही नावं आहेत. हे सर्व शिंदे गटाचे नेते आहेत. तुम्ही सुरज चव्हाणवर कारवाई केली त्याच्या प्रार्टनरवर का कारवाई केली जात नाही? असा सवाल यावेळी संजय राऊतांनी केला आहे.(Khichdi Scam)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम