Skip to content

खेड भैरवला यात्रेनिमित्त बैलगाडा टांगा शर्यत उत्साहात संपन्न


राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील खेड भैरवनाथ येथे सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेल्या भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्ताने खेड ग्रामपंचायत व बैलगाडा प्रेमी, यात्रा कमिटीच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय बैलगाडा टांगा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

या भव्य अश्या आयोजित केलेल्या टांगा शर्यतीला निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदी तालुक्यासह जिल्हा भरातून बैलगाडा मालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या भव्य बैलगाडा शर्यतीला जिल्हाभरातून हजारो बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैलगाडा शर्यती निमित्ताने खेड परदेशवाडी येथील शुक्ल तीर्थ परिसरात भव्य अश्या मैदानात या टांगा बैलगाडा शर्यती पंच कमिटीच्या नियम अटी शर्ती निर्णयानुसार उत्साहात संपन्न झाल्या. या बैलगाडा शर्यतीला बहुसंख्य स्टॉल दुकाने थंड पेय असे विविध स्टॉल लागले होते.

डॉल्बी च्या तालावर ही भव्य बैलगाडा शर्यत मोठया उत्साहात संपन्न झाली. यात्रा कमिटी,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ वृंद यांनी सर्व बैलगाडा मालकांचे बैलगाडा प्रेमींचे आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!