Skip to content

कणकापूर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी नामदेव शिंदे यांची तर व्हा.चेअरमन पदी देवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड


देवळा : कणकापूर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी भाजपचे नामदेव बापू शिंदे यांची दुऱ्यांदा तर व्हा.चेअरमन पदी देवाजी पर्वत शिंदे यांची निवड करण्यात आली . कणकापूर विकास सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. बुधवार दि ५ रोजी सोसायटीच्या नूतन चेअरमन, व्हा चेअरमन पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तोरवणे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.

कणकापूर विकास सोसायटीचे चेअरमन नामदेव शिंदे , व्हा.चेअरमन देवाजी शिंदे यांच्या निवडी प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ व सभासद आदी (छाया – सोमनाथ जगताप)

देवळा बाजार समिती निवडणुकीत विक्रमी अर्ज; नानांच्या ‘होम मिनिस्टर’ मैदानात चुरस वाढणार

यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी नामदेव शिंदे यांची तर व्हा चेअरमन पदी देवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी संचालक सर्वश्री श्रीमती निर्मला शिंदे,अनिता शिंदे,बापू शिंदे,दादाजी शिंदे,दिनकर शिंदे,कडू शिंदे,निंबा बर्वे,दशरथ मोहिते ,अशोक शिंदे,किशोर सावकार,काळू पवार उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर,आमदार डॉ राहुल आहेर ,डॉ किरण शिंदे , युवा नेते संभाजी आहेर , अड तुषार शिंदे ,युवा नेते संभाजी आहेर, उपसरपंच जीभाऊ शिंदे, माजी उपसरपंच तुषार शिंदे, उपसरपंच जगदीश शिंदे, माजी उपसरपंच माणिक शिंदे,माजी व्हा चेअरमन सुनील शिंदे, नितीन शिंदे , सतिष शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे .

कणकापूर विकास सोसायटीच्या मागच्या संचालक मंडळात नामदेव शिंदे यांची चेअरमन पदी वर्णी लागली होती. यानंतर आत्ता नविन संचालक मंडळात निवड झालेले नामदेव शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा पहिल्या टप्प्यात चेअरमन पदाची माळ पडल्याने त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!