Kalyan Lok Sabha | मुलाची जागा आली, पण शिंदेंच्या हातून बालेकिल्लाच गेला..?

0
13
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok Sabha

Kalyan Lok Sabha | महायुतीत अजूनही अनेक जागांचा तिढा हा सुटलेला नसल्याने निवडणुका अगदी तोंडावर आल्या असूनही या वादग्रस्त जागांवरील उमेदवार जाहीर होऊ शकलेला नाही. शिवसेना शिंदे गटाने अद्याप आपल्या उमेदवारांची एक यादी जाहीर केली असून, या यादीत ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यापैकी चार उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले आहे. या पहिल्या यादीत एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली नव्हती.(Kalyan Lok Sabha)

त्यामुळे आता त्यांचेही तिकीट धोक्यात असल्याची चर्चा होती. दरम्यान, यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिसेनेचाच आहे आणि श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. मात्र, कल्याणचा तिढा सुटला असला तरीही मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. कारण या मतदारसंघासाठी भाजप प्रचंड आग्रही असून, शिंदेंनाही हा मतदार संघ हवा आहे. (Kalyan Lok Sabha)

Kalyan Lok Sabha | श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून ‘या’ महिला उमेदवाराला संधी.?

कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजप आमदार नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह होता. दरम्यान, आता अखेर श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा ही स्वतः फडणवीस यांनी केल्याने हा तिढा सुटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता प्रतिष्ठेचा विषय आहे तो ठाणे लोकसभा मतदार संघ. ही जागा कोणाकडे जाणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Kalyan Lok Sabha)

Kalyan Lok Sabha | शिंदेंच्या उमेदवारांना भाजपचा विरोध 

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिंदेंचा बालेकिल्ला असून, यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. येथून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधान परिषद नेते रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा असून, या तिन्ही नावांना भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांचा ही जागा आपल्याला मिळावी. यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. तर, या जागेवर भाजपकडून डॉ. संजीव नाईक हे इच्छुक आहे. दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघामुळे शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Kalyan Lok Sabha)

Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या

लवकरच अधिकृतरीत्या उमेदवारीची घोषणा

पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा न झाल्याने त्यांच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यावरून अनेक चर्चाही सुरू होत्या. कारण कल्याणमध्ये स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांसह अनेक स्थानिक भाजप नेते श्रीकांत शिंदेंवर नाराज असल्याने त्यांना येथून उमेदवारी मिळेल का? की मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचीही उमेदवारी भाजपच्या नाराजीमुळे धोक्यात येणार. याबाबत चर्चा होती. दरम्यान, अखेर स्वतः फडणवीस यांनीच ही चर्चा संपवली असून, त्यांनी श्रीकात शिंदेच कल्याणचे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता लवकरच शिंदे गटाकडून दुसरी यादी जाहीर केली जाईल आणि अधिकृतरीत्या श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. (Kalyan Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here