Jitendra Awhad | शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी “अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?” अशी टिका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता उदयकुमार आहेर (Udaykumar Aher) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)हे अगदी सुरुवातीपासूनच अजितदादांचा द्वेष करणाऱ्या काही व्यक्तींपैकी एक आहेत. दादांच्या कर्तबगारीमुळे आपल्याला पक्षात हवी ती किंमत व स्थान मिळत नाही. यामुळे त्यांची नेहमीच चीड चीड होत होती. दादांनी विकासाच्या मुद्द्यांवर पक्ष नरेंद्र मोदींसोबत नेल्याने यांना खरे तर आसुरी आनंद झाला आहे. कारण यांना आता ‘वासरात लंगडी गाय शहाणी’चा फील मिळतोय.
NCP | उदयकुमार आहेरांवर राष्ट्रवादीच्या ‘प्रवक्ते’ पदाची जबाबदारी
Jitendra Awhad | ‘या’ संधीसाधू लोकांना आणखी काय हवे..?
राज्यभर कधी नव्हे इतका फोकस मिळतोय. दुय्यम दर्जाचे स्थानिक पदाधिकारी असल्या दुय्यम दर्जाच्या नेत्याला डोक्यावर घेत आहेत. शरद पवार साहेबांचे नाव पुढे करून यांना स्वतःला आयत्या पिठावर रेखोट्या ओढायची संधी मिळाली आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या (Jitendra Awhad) संधीसाधू लोकांना आणखी काय हवे..? पवार कुटुंबियातील फूट यांच्यासाठी इष्ट्टापत्ती आहे.
त्यांनी अनेक वर्ष अल्ला पाण्यात ठेवले
फूट पडावी यासाठी त्यांनी अनेक वर्ष अल्लाला पाण्यात ठेवले होते. त्यात त्यांना यश आले असले. तरीही या निवडणुकीत मात्र देव व अल्ला निधर्मी असणाऱ्या दादांसोबत आहेत. निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल. मुंब्रा मतदारसंघात दादांच्या कार्यकर्त्यांमुळे व रणनीतीमुळे जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) यश मिळाले होते. या निवडणुकीत ते पुन्हा कसे निवडून येतात. हे दादा नाहीत तर दादांचे कार्यकर्तेच पहातील. जितेंद्र आव्हाड पुन्हा मुंब्रा मतदार संघाचे आमदार होणार नाहीत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे चॅलेंज आहे, या शब्दांत उदयकुमार आहेर (Udaykumar Aher) यांनी आव्हाड यांना थेट खुले आव्हानच दिले आहे.
Ajit Pawar | शालिनीताईंचा मानसिक तोल ढासळला; उदयकुमार आहेरांचे प्रत्युत्तर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम