Crime news | शेजारचं दुकान भाड्याने घेतलं, भिंत फोडत ज्वेलरचं दुकान लुटलं

0
33

Crime news |  चोरी करण्यासाठी चोरटे काहीही शक्कल लढवतात. मात्र, डोंबिवलीत चोरट्यांनी हद्दच केली. डोंबिवली येथे चोरट्यांनी चक्क भिंत पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केली. दुकानात असलेले सोने तसेच चांदीचे ७६ लाख रुपये किंमतीचे दागिने ह्या चोरांनी लंपास केले आहेत. धक्कादायक, म्हणजे ही चोरी करण्यासाठी त्यांनी फूलप्रूफ प्लॅन आखलेला होता. ह्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करण्यासाठी त्यांनी आधी शॉपच्या शेजारचं दुकान हे भाड्याने घेतलेलं होतं.

त्यानंतर त्यांनी बाजूच्या दुकानातून ज्वेलरी शॉपच्या भिंतीला मोठं भगदाड पाडत भिंत फोडली आणि चोरटे आत घुसले व त्यांनी तब्बल ७६ लाख रुपये किंमतीचे दागिने हे चोरून नेले. डोंबिवली येथील विष्णू नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ह्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या टीम बनवलेल्या असून, सविस्तर तपास सुरू केलेला आहे.(Crime news)

Nashik Crime | मुल्हेर येथे ९ लाखांचा गुटखा हस्तगत

मोमोज विकण्यासाठी घेतलं दुकान

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोड येथे ;रत्नसागर ज्वेलर्स; ह्या नावाचे दुकान आहे. तेथे २८ नोव्हेंबर रोजी ही चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी ह्याच्या पलीकडच्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडत भिंत फोडली आणि ते ज्वेलरी शॉपमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी ह्या दुकानाच्या डिस्प्ले काऊंटरला लावलेले लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांपास केले.(Crime news) तसेच त्यांनी ह्या दुकानातील तिजोरीदेखील फोडण्याचा प्रयत्न केला. पण, ती तोडण्यात चोरांना अपयश आले.

ही चोरी करण्यासाठी आधीच चोरट्यांनी फूलप्रूफ प्लॅन आखलेला होता. त्यांनी काही दिवसांआधीच रत्नसागर ज्वेलर्सच्या बाजूला असलेला दुकानाचा गाळा हा भाड्याने घेतलेला होता. मोमोजचे दुकान सुरू करण्याच्या बहाण्याने त्यांनी हा गाळा भाड्याने घेतलेला होता. पण, बऱ्याच दिवसानंतरही दुकान सुरू झाले नसल्याने, दुकानमालकाने त्यांना विचारणा केली असता, घरात कोणाला तरी बरं नसल्या कारणाने, ते दुकान सुरू करायला काही वेळ लागेल असे खोटे कारण त्यांनी दिले होते.(Crime news)

त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्या दुकानातून शेजारच्या ज्वेलरी शॉपची थेट भिंत फोडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी हळूहळ खड्डा खणायला सुरूवात केली व त्यानंतर ते ज्वेलर्सच्या दुकनात शिरले व चोरी करत लाखो रुपयांचे दागिने लंपास केलेत. याप्रकरणी, डोंबिवली येथील विष्णू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, पोलिसांची तीन पथके ह्या आरोपींच्या शोधासाठी पाठवण्यात आलेली आहेत.(Crime news)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here