Israel | इस्त्राईलमध्ये युद्धसंग्राम..भारतावर काय होणार परिणाम?

0
25

Israel | हमास संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरु झालेल्या युद्धात सारं जग होरपळून निघतांना दिसतंय. पण ज्या इस्रायलकडे सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान होतं, त्या देशावर हल्ला कसा झाला, का झालं?  असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले होत आहेत. इस्रायलमधील दोन्हीकडच्या रहिवाशी भागांवर हल्ले होत आहेत. रस्ते-चौक आणि निवासी भागांचं युद्धभूमीत रुपांतर झालेलं आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीतल्या एका इमारतीवर हल्ला झाला आणि काही क्षणात इमारत जमिनदोस्त झाली आहे. आकाशात काळोख, चारीबाजूंनी येणारे हल्ल्यांचे आवाज आणि घाबरलेले लोक हेच चित्र सध्या इस्रायलमध्ये आहे. (Israel)

Crime News | सासुबाई जरा सांभाळुन…

इस्रायल – हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. इस्रायल हा जेमतेम 95 लाख लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याच्या चारही बाजूला शत्रूराष्ट्र आहे. मात्र यावेळी हमास या संघटनेच्या हल्ल्यामागे इस्रालच्या आयर्न डोमबाबत शंकादेखील उपस्थित होत आहेत. इस्रायलचे आयर्न डोम काही भागात सक्रीय होतं परंतु काही भागात या यंत्रणेचा चकवा देत मिसाईल्स इस्रायलच्या भूमीवर आदळल्या होत्या. ड्रोनद्वारे इस्रायलवर हे सगळे हल्ले झाले पण जमिनीवर पोहोचण्याआधीच ते ड्रोन हवेतच नष्ट होत आहेत. हवेतच ड्रोन नष्ट करणाऱ्या या यंत्रणेलाच इस्रायलचं आयर्न डोम म्हटलं जातं.

आयर्न डोम नक्की कसं काम करतं?

रडार युनिट, टार्गेट युनिट आणि हे फायर युनिट असे ३ भाग मिळून इस्रायलचं आयर्न डोम बनलेलं आहे. हे तिन्ही उपकरणं इस्रायलची हवाई सुरक्षा करत असतात. समजा शत्रूने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आणि काही सेकंदातच रडार युनिट त्या रॉकेटला ट्रॅक करते. टार्गेट युनिट त्याचा वेगाचा अंदाज घेऊन लक्ष्य करते व फायर युनिटमधून निघणारी मिसाईल हवेतच शत्रूच्या हल्ल्याला नष्ट करतं. परंतु असं म्हटलं जात आहे की, यावेळी हमासनं या आयर्न डोम यंत्रणेतल्या त्रुटी शोधल्या आहेत. सर्वाधिक कमी अंतराने हल्ला केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्त रॉकेट हल्ले झाल्यानं आयर्न डोम यंत्रणा पूर्ण ताकदीने हल्ला रोखू शकली नाही.

Election | टाकेद ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत सदस्यपदी ‘गंगुबाई बगड’ बिनविरोध

इस्रायल आणि हमासचा इतिहास काय? 

इस्रायल-हमासमधल्या युद्धाची बीजं अनेक वर्षांपूर्वीच्या घडामोडीत आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन-वेस्ट बँक व गाझा पट्टीचा जो भूभाग आहे. त्यावर 1948 आधी ब्रिटीशांची सत्ता होती. विश्वयुद्धानंतर ज्युंसाठी ‘इस्रायल’ देशाची स्थापना केली गेली होती. 1948 साली हिरव्या रंगाचा भूभाग आहे. तो पॅलेस्टाईन झाला व निळ्या रंगाचा भूभाग इस्रायल देश म्हणून घोषित झाला होता. पण इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रालयच्या निर्मितीला विरोध करत 1949 मध्ये इस्र्याल देशावर हल्ला केला.

एकट्या इस्रायलने या चारही देशांना युद्धात पराभूत केलं होतं. पण जॉर्डन या देशाकडे पॅलेस्टाईनच्या वेस्टबँक भागाचं नियंत्रण आलं होतं. तर गाझा पट्टी म्हटल्या जाणाऱ्या या भागात इजिप्त देशाने कब्जा केला. यावेळी पॅलेस्टाईन देशाचे अस्तित्व अगदी संपुष्ठात आले होतं.  1967 साली पुन्हा युद्धा झाले. यावेळी इस्रायलनं जॉर्डनकडून वेस्टबँक आणि इजिप्तकडून गाजा पट्टीवर कब्जा करण्यात आला. त्यावेळी जवळपास पूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलच्या ताब्यात गेला.

1993 मध्ये इस्रायल नियंत्रित भागाबाबत पॅलेस्टाईनशी शांती करार झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांचं अस्तित्व मान्य केलं होतं. पण 5 वर्षानंतर करार संपुष्टात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत हा वाद सुरु आहे. पुढे गाझा पट्टीतून इस्रायलने हजारो सैनिक मागे घेतले. त्याच भागात हमास नावाची संघटना जन्माला आली. ज्या संघटनेचं हेतु इस्रायलचा खात्मा करणे आहे.

अगदी सोप्या भाषेत बघायचं असेल तर जसे अमेरिका -अफगाणिस्तान या वादात तालिबान ही एक संघटना होती. तसेच इस्रायल – पॅलेस्टाईन वादात हमास संघटनेचा रोल आहे. आज गाझा पट्टीत हमासचा कब्जा आहे आणि तेथूनच इस्रायल देशावर हल्ले सुरु आहे. दुसरीकडे इस्रायलनं गाझा पट्टीतून हमास याला हद्दपार करण्याचा दावा केलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here