Skip to content

Dasra Melava | शिंदेंनी घेतली माघार; शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा?


Dasra Melava : दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्क कोणत्या गटाला मिळणार?  या प्रश्नाकडे सध्या शिवसैनिकांचे लक्ष लागलेलं आहे. पण शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ठाकरेंचा शिवाजी पार्क मैदानासाठीचा मार्ग मोकळा झाला अशा चर्चांना उधान आलेलं आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. परंतु, याचा अर्थ ठाकरेंना BMC कडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. (Dasra Melava)

मुंबई महापालिका प्रशासनाने शिंदे गट-ठाकरे गट यांपैकी कुणीही दसरा मेळाव्यासाठी मागणी करणारा अर्ज मागे घेतला नसल्याचे सांगितलं जात होतं. तसेच येत्या रविवारपर्यंत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय घेणार असल्याची माहितीदेखील मनपा प्रशासनानं दिली आहे. मात्र आता शिंदेंनी शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेतल्याचं दिसत आहे.

Israel | इस्त्राईलमध्ये युद्धसंग्राम..भारतावर काय होणार परिणाम?

शिंदेंचं पाऊल मागे, ठाकरेंचा मार्ग होणार का मोकळा? 

मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पेटलेल्या आहेत. अशातच आता ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहेत. पण अद्याप मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजीपार्क मैदानाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे शिंदे गटाने एक पाऊल मागे घेत जरी दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलेलं असलं तरी BMC प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, अद्याप शिवाजीपार्क मैदानासाठी मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेला अर्ज अजून त्यांनी मागे घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरेंना अडचणीत आणण्याची शिंदे गटाची ही नवी खेळी तर नाही ना अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

शिंदें गटाने दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ठाकरेंना शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं मिळणार कोणाला? हा वाद संपणार अशी चिन्ह दिसत आहेत.

मंत्री दीपक केसरकर नक्की काय म्हणाले

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहेत. आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाहीत. विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे वादात न पडता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो. हे आता जनतेनंही ओळखावं, असा टोलाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावलेला आहे. सावंतवाडीतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!