Indian Navy | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी नौदलाकडून चौकशी समितीची नेमणूक

0
60

Indian Navy : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंनी बनवलेला पुतळा उभारण्यात आला होता. जो अनावरण झाल्यानंतर आठ महिन्यातच कोसळला या घटनेनंतर आता शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा अनावरणानंतर धड वर्षभरही उभा राहिला नाही. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून आता संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतरच्या या प्रकरणात दोन व्यक्तींविरुद्ध एफ.आय.आर दाखल करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉक्टर चेतन पाटील व ठेकेदार आणि आर्टिस्ट कंपनीचे मालक जयदीप आपटेंवर बेजबाबदारपणाचा ठपका दाखल करण्यात आला आहे.

Chatrapati Shivaji Maharaj | मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला; विरोधकांचा सरकारला इशारा

भारतीय संहितेनुसार, 109, 110, 125 आणि 318 (3) (5) अशा विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याचबरोबर पूतळा कोसळण्याच्या या घटनेमध्ये सहाय्यक इंजिनियर आणि पीडब्ल्यूडी अधिकारी अजय पाटील यांनी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मालवणयेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता. तेव्हा या संपूर्ण घटनेची जबाबदारी घेत भारतीय नौदलाने या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर पुतळा तातडीने उभारण्यासाठी लवकरात लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करणार असल्याचे नौदलाकडून यावेळेस सांगण्यात आले आहे. तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची पाहणी देखील केली जाणार आहे.

संबंधित पत्र नौदलाकडे देण्यात आले होते – बांधकाम विभाग

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा भव्य पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. त्यानंतर आता मंत्री दीपक केसरकर आणि काँग्रेस नेते संदेश पाटील किल्ल्याची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिवरायांचा पुतळा दुरावस्थेत असल्याबाबतचे पत्र 20 ऑगस्ट रोजी नौदलाला देण्यात आले होते असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray | ‘संजय राऊत माझा पाठलाग करायचे’; गंभीर आरोप करत महिलेने ‘उद्धव दादां’कडे मागितला न्याय

एफ.आय.आरमध्ये नेमकं काय म्हटलंय? 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ठेकेदार आणि आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न माध्यमांकडून केला गेला. परंतु कॉल्स आणि मेसेजेस ना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच घटनेनंतर त्यांच्या कल्याणी येथील निवासस्थानी टाळं असल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर आता पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी जयदीप आपटे यांना ई-मेल द्वारे पुतळ्याचा नट बोल्ट गंजण्याची माहिती दिली असल्याची बाब समोर आली. त्यामुळे पुतळा दुरावस्थेत असल्याचे माहित असूनही त्याबद्दल कसलीही पावले उचलली गेली नाहीत. असे एफ.आय.आरमध्ये नमूद करण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here