Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘X’ (ट्विटर) वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड व मल्लिकार्जुन पुजारी नामक व्यक्ती यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पोस्ट केली. ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्याच व्हायरल ऑडिओ क्लिप वर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आघाडी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरती गंभीर आरोप केले आहेत. “त्या क्लिप मधला आवाज माझा नाही. राज ठाकरे यांनी माझा आवाज काढलायं.” असं म्हणत राज यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर राज ठाकरे ‘सुपारी ठाकरे’ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
” ती फार जुनी ऑडिओ क्लिप आहे.” – जितेंद्र आव्हाड
“मी ती व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकली. माझ्या मते ती पाच ते सहा वर्षांपूर्वीची जुनी ऑडिओ क्लिप आहे, जेव्हा आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन पुजारी होते. ज्यांचे नाव मी या क्लिपमध्ये घेतले आहे. त्यांना पक्षात मीच घेऊन आलो त्या मागचं बॅकग्राऊंड मी सांगू शकत नाही. परंतु ती क्लिप मात्र सहा वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे जर जुनी क्लिप काढून वापरली जाणार असेल, तर अशा अनेक क्लिप्स निघतील. सुपारी घ्यायची म्हणजे सुपारी ठाकरे घेणारच ना!” असा खोचक सवाल ही प्रतिक्रिया देत त्यांनी केला. मी मीडिया ट्रायला घाबरत नाही. तेव्हा परिस्थिती काय होती हे कोणालाही माहित नाही. प्रकरण जर एवढं गंभीर होता तर पोलिसांनी माझ्यावर केस कशी केली नाही? असं देखील ते म्हणाले.
वायरल क्लिप मुळे मनसे आणि आव्हाडांमध्ये वाद रंगण्याची शक्यता
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ऑफिशियल ‘x’ (ट्विटर) हँडल वरून जितेंद्र आव्हाड यांची मल्लिकार्जुन नामक इसमासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. त्यानंतर आव्हाडांकडून त्यावर प्रतिक्रिया देत ती जुनी ऑडिओ क्लिप असून तो माझा आवाजच नाही असं म्हणत स्पष्टीकरण दिले. याप्रकरणी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांचा ‘सुपारी ठाकरे’ असा उल्लेख करत त्यांच्यावरती गंभीर आरोप केले. या सर्व प्रकरणामुळे आता मनसे आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होते.
व्हिडिओ क्लिप बनावट असल्याचा आव्हाडांचा दावा
बदलापूर मध्ये एवढी मोठी घटना घडली परंतु राज ठाकरे पीडितांना भेटायला का गेले नाहीत? अशावेळी माणुसकीच्या नात्याने 24 तासाच्या आत तिथे पोहोचवून प्रकरणाची चौकशी करायची असते. मराठी मनाचा अभिमान असणारे राज ठाकरेंनी पीडित मुलींच्या आई-वडिलांवरती मायेने हात फिरवायला जायला हवा होतं. हे सगळं सोडून माझ्या विरोधात प्रेसकॉन्फरन्स घ्यायचं त्यांच्या लक्षात होतं. असं म्हणत राज ठाकरेंवरती टीका केली. त्याचबरोबर ऑडिओ क्लिप मधला आवाज माझा नाहीच. राज ठाकरे यांनीच माझा आवाज काढून ती ऑडिओ क्लिप तयार केली आहे. राज ठाकरे किती मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम