Skip to content

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर सहज विजय; सातव्यांदा कोरले आशिया चषकावर नाव


मुंबई : भारतीय महिला संघांनी बांगलादेश येथे सुरु असलेल्या महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विक्रमी सातव्यांदा विजेतेपद पटकावले.

बांगलादेशमधील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकाचा अंतिम सामना भारत व श्रीलंका यांच्यात पार पडला. यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेचा हा निर्णय त्यांच्यासाठी घातकी ठरला. यावेळी रेणुका ठाकूरने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा अर्धा संघ अवघ्या २० धावांवर गडाला होता. मात्र तळाशी आलेल्या ओशादी रणसिंघे (१३) आणि इनोका रणवीरा (१८*) यांनी केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेचा डाव २० षटकात ६५ धावांवर आटोपला.

अवघ्या ६६ धावांच्या आव्हान पार करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर स्मृती मंधानाने आक्रमक फटकेबाजी करत भारताला ३ षटकात २५ धावांपर्यंत पोहचवले. मात्र लंकेनेही भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. मात्र, स्मृतीच्या २५ चेंडूत ५० धावांची दमदार खेळीला कर्णधार हरमनप्रीतची साथ लाभत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका ठाकूर हिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्ती शर्माला मालीकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारताचे हे विक्रमी सातवे विजेतेपद असून २०१८ वगळता आतापर्यंतच्या सर्व आशिया चषक स्पर्धांचे विजेतेपद पटकावले. महिलांच्या आशिया चषक स्पर्धेला २००४ पासून सुरुवात झाली असून या सर्व स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ खेळलेला आहे. पण २०१८ मध्ये बांगलादेशने धक्कादायक पराभव केल्यामुळे महिला संघाला तेव्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!