अमित ठाकरेंच्या संकेतामुळे आणखीन एक ठाकरे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात ?

0
3

मुंबई : राज ठाकरेंचे सुपुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आगामी काळात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर आणखीन एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना पक्ष स्थापन केला. तेव्हा त्यावेळी बाळासाहेब यांनी मी किंवा माझ्या घरातील कोणीही सदस्य निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे अनेक निवडणुकीत स्वतः व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची निवडणूक न लढण्याची परंपरा सुरु होती. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांचे नातू आदित्य यांनी ही परंपरा मोडत विधानसभा निवडणूक लढवली व जिंकून ठाकरे घराण्यातील पहिले आमदार बनले होते. पुढे महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर लगेचच विधान परिषदेचे सदस्य बनले होते. मात्र, पक्षातील अभूतपूर्व बंडानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदासोबत विधान परिषद सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा अजूनही प्रलंबित आहे.

तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी भूमिकाही जाहीर केली होती. पण आजवर त्यांनी मात्र निवडणूक लढवली नाही. पण आता अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्याने आपल्या चुलत भावाच्या पावलावर पाऊल ठेवत असे संकेत दिले आहे. सध्या अमित ठाकरे राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून ते जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. त्यावेळी त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच सध्याची स्थिती, मनसेची पुढील वाटचाल याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे मुलाखतीत ?

अमित ठाकरे यांना शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे आता भाजपला मनसेची गरज नाही असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले, की असे काही नाही. पण सध्या आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करतो, लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे कोणत्या पक्षाला कुणाची गरज आहे हे सांगता येणार नाही. मात्र महाराष्ट्राला आता राजसाहेबांची गरज आहे हे मला माहित आहे. म्हणूनच आम्ही आता स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. तसेच युतीचा निर्णय राजसाहेब घेतील. पण गरज पडली तर मीसुद्धा निवडणूक लढवू शकतो. आणि यापुढे ग्रामपंचायत निवडणूक असो की विधानसभा, प्रत्येक ठिकाणी मी प्रचारासाठी जाणार आहे, असे उत्तर ठाकरे यांनी दिले आहे.

तसेच, ते हेदेखील म्हणाले, की मी वडिलांमुळे राजकारणात आलो, अन्यथा मी राजकारणात उतरलो नसतो. पण आताची राजकीय परिस्थिती बघता राजकारणात येण्याची माझी इच्छाच झाली नसती, असे म्हणत सध्याची राजकारणातली परिस्थिती भयावह असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

अमित ठाकरे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास 

– राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अमित ठाकरे यांचा वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग

– जानेवारी २०२० मध्ये वयाच्या २८ व्या वर्षी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश

– अमित ठाकरे यांचे राजकारणात प्रवेश होताच नेतेपदासह मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

– २७ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here